जाहिरात
Story ProgressBack

इचलकरंजीतील 4 मुलांचं अपहरण, बंद खोलीत आरोपीचा धक्कादायक प्रकार; संतापजनक Video

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.

Read Time: 3 mins
इचलकरंजीतील 4 मुलांचं अपहरण, बंद खोलीत आरोपीचा धक्कादायक प्रकार; संतापजनक Video
इचलकरंजी:

इचलकरंजीत खंडणीची मागणी करत मुलांचे अपहरण करून बंद खोलीत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार मुलांना जबर मारहाण करत धमकी देत असल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.  याप्रकरणी सात जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर येथील रहिवासी असलेले हे सात जण मोक्काचे आरोपी आहेत.

इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार खून मारामारी मोक्कातील आरोपी जामीनावर सध्या बाहेर आहे. याने चार जणांना जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसात तक्रार केली तर घरात येवून गोळ्या घालीन, 'शाम लाखे ' म्हणतात मला, अशी धमकी देत असल्याचं व्हिडिओत दिसून येतं.

मोक्कातून सुटलेल्या गुन्हेगाराने चार मुलांना बंद खोलीत अमानुष मारहाण केली. खंडणीसाठी रस्त्यातूनच जबरदस्तीने गाडीवर बसवत घरात आणले. त्यानंतर काही जणांनी मुलांचे हात पाय धरले आणि अर्धनग्न अवस्थेत लाखे याने खाली झोपवून त्यांच्या मानेवर पाय ठेवून दोन्ही मांड्यांवर, हातावर, पायांच्या तळव्यांवर लोखंडी पाईपने जबरी मारहाण केली.  मारहाणीचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

याच्याविरोधात शहरातून सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त झाल्यानंतर याची दखल शहापूर पोलिसांनी घेतली. याप्रकरणी शाम लाखे याच्यासह त्याचे वडील, आदर्श उर्फ आद्या, माया, सुरज यांसह एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर अपहरण, बाल न्याय कायद्यासह विविध सहा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर (वय19) यांसह चार मुले (सर्व रा.जयभीमनगर, इचलकरंजी) जखमी झाली आहेत. मारहाणीची घटना लाखे याच्या घरी दत्तनगर गल्ली नं. चारमध्ये घडली असून याची नोंद पोलिसांत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाली.

नक्की वाचा - दारू सोडवायला भोंदू बाबाकडे गेला, बाबाने धू धू धुतला; Video तुफान व्हायरल!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डुक्कर मारण्याचा कारणावरून संशयित तिघांनी फिर्यादी रावसाहेब वडर याच्यासह जखमी चार मुलांना जबरदस्तीने गाडीवर बसवले आणि शाम लाखे याच्या घरी आणले. मुलांना शिवीगाळ करत दोघांनी वडर याचे हात पाय धरले. त्यानंतर लाखे याने त्याला पुन्हा शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. वर्धमान चौकाकडे दिसायचे नाही. इकडे आलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून आता मला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली आणि जवळील तीन हजार रुपये देण्यास भाग पाडले.

बेदम मारहाण करताना मुलांचा आरडाओरडा हृदयद्रावक होता. ते किंचाळत मोठा आक्रोश करीत होते. दोघांनी पाय तर दोघांनी हात धरायाल लावून लाखे याने हातात काठी घेऊन मांडीवर लोखंडी पाईपने केलेली मारहाण अक्षरशः अमानुष आहे. 

दहशतीसाठी व्हिडिओ व्हायरल 
लाखे याच्यावर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून याच गुन्ह्यात त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. त्यातून सुटका झाल्यानंतरही त्याने खंडणीच्या उद्देशाने लहान मुलांना अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडिओ केला आणि व्हायरल केला. दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
दारू सोडवायला भोंदू बाबाकडे गेला, बाबाने धू धू धुतला; Video तुफान व्हायरल!
इचलकरंजीतील 4 मुलांचं अपहरण, बंद खोलीत आरोपीचा धक्कादायक प्रकार; संतापजनक Video
pune 14 year old boy drove tanker in accident woman and children injured
Next Article
धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने भरधाव चालवला टँकर, धडकेत महिलेसह काही मुले जखमी  
;