जाहिरात
This Article is From May 11, 2024

माणूस की हैवान! आईसह पत्नीचा खून केला, 3 लेकरांना संपवलं, स्वत: केली आत्महत्या 

एक अशी घटना जी तुम्हाला हादरवून सोडेल. या घटनेत एका माथेफीरूने आपल्याच कुटुंबातील पाच जणांचा खुन केला आहे. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली.

माणूस की हैवान! आईसह पत्नीचा खून केला, 3 लेकरांना संपवलं, स्वत: केली आत्महत्या 
यूपी के सीतापुर में पांच लोगों की हत्या
नवी दिल्ली:

एक अशी घटना जी तुम्हाला हादरवून सोडेल. या घटनेत एका माथेफीरूने आपल्याच कुटुंबातील पाच जणांचा खुन केला आहे. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील सीतापूर इथं ही घटना घडली असून, सर्वच जण या घटनेने हादरून गेले आहेत. आरोपीने आधी आपल्या आईची गोली झाडून हत्या केली. त्यानंतर त्यांने आपल्या पत्नीवर हतोड्याने हल्ला करत तिचाही खुन केला. तो येवढ्यावरच थांबला नाही. त्याने आपला मोर्चा आपल्या तीन लहान मुलांकडे वळवला. तीनही मुलांना त्याने एक एक करून इमारतीच्या छतावरून खाली फेकले. त्यात तीनही मुलांचा मृत्यू झाला. पाच जणांची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या केली. अनुराग सिंह असे त्याचे नाव असून तो 45 वर्षाचा आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले 

या घटनेनंतर पोलिसांनी थेट घटनास्थळ गाठलं. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करताना अजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस करण्यात आली. शिवाय त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली. कोणत्या कारणासाठी या व्यक्तीने आपल्याच कुटुंबातील पाच जणांचा खून केला याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे. 

हेही वाचा - लोकसभा निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येणार? भेंडवळचं मोठं भाकीत जाहीर

आरोपीला होते दारूचे व्यसन 

प्राथमिक चौकशीत आरोपी अनुराग याला दारू पिण्याचे व्यसन होते. हे व्यसन सुटावे यासाठी त्याचे कुटुंब आग्रही होते. त्याची ही सवय सुटावी म्हणून नाशा मुक्ती केंद्रात त्याला पाठवलं जाणार होते. मात्र अनुराग याला नशा मुक्ती केंद्रात जायचे नव्हते. त्याचा त्याला विरोध होता. यावरून अनुरागची भांडणं झाली होती. त्यामुळे रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजत आहेत. 

हेही वाचा - अरविंद केजरीवालांचा बाहेर येताच भाजपवर निशाणा, उद्याचा कार्यक्रम जाहीर करत म्हटलं...

आरोपी होता मनोरूग्ण 

आरोपी अनुराग हा मनोरूग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. सीतापूर पोलीस अधिक्षक चक्रेश मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. त्यातूनच त्याने हे भयंकर हत्याकांड केले. त्यात त्याची आई सावित्री देवी (65) आणि पत्नी प्रियंका (40) यांच्यासह तीन मुलांचाही समावेश आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com