जाहिरात

धक्कादायक! सख्खा भाऊ पक्का वैरी, अंगावर काटा आणणारी घटना

शिवाजी हरवू कसा शकतो असा संशय त्याच्या नातेवाईकांना आला. त्यातून त्यांनी शिवाजीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते शोध शोधत शेतात गेले.

धक्कादायक! सख्खा भाऊ पक्का वैरी, अंगावर काटा आणणारी घटना
हिंगोली:

समाधान कांबळे 

हिंगोलीत सख्ख्या मोठ्या भावाने प्रॉपर्टीसाठी आपल्या लहान भावाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्याने तो मृतदेह मित्राच्या साह्याने शेताता पुरला. सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथे ही खुनाची घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भाऊ संपत्तीसाठी सख्ख्या भावाचाच खून कसा करू शकतो अशी चर्चा परिसरात सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

किसन खोडके यांची शेगाव खोडके  या गावात शेती आहे. त्यांना हरिभाऊ खोडके आणि शिवाजी खोडके ही दोन मुलं आहेत. हरिभाऊ हा मोठा आहे. त्याला वडीलांची सर्व जमिन हवी होती. वडीलांच्या संपत्तीत कोणी वाटेकरी नको असं त्याला वाटत होतं. त्यामध्ये लहान भाऊ शिवाजी खोडके होता. त्यालाही वाटा मिळेल. आपल्या वाट्याला कमी जमीन येईल असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याने निर्दयीपणे आपल्या लहान भावाचाच काटा काढण्याचा कट रचला. 

ट्रेंडिंग बातमी - सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?

यासाठी त्याने आपल्या एका मित्राची मदत घेतली. भावाला शेतात बोलवून घेतलं. तिथेच त्याचा गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर त्याच शेतात त्याला पुरलं. त्यानंतर तो घरी आला. भाऊ हरवल्याचा त्याने बनाव केला. सगळ्या ठिकाणी शोधाशोध केली. त्यानंतर तो स्वत: पोलिस स्थानकात गेला. तिथे गेल्यावर त्याने आपला भाऊ शिवाजी वय वर्ष 23 हा हरवला आहे अशी तक्रार दिली. पोलिसांनी ही त्याची तक्रार नोंदवून घेतली.   

ट्रेंडिंग बातमी - वडील काँग्रेसकडून 5 वेळा आमदार, आता लेकीला मंत्रिपद; कोण आहेत मेघना बोर्डीकर?

पण शिवाजी हरवू कसा शकतो असा संशय त्याच्या नातेवाईकांना आला. त्यातून त्यांनी शिवाजीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते शोध शोधत शेतात गेले. तिथे त्यांना शेतात एक खड्डा दिसला. तिथे त्यांनी तो खड्डा उकरून पाहीला. त्यात त्यांना शिवाजीचा मृतदेह असल्याचा आढळून आला. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा खून भावानेच केल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. त्यांनी तातडीने  हरिभाऊ खोडके व त्याचा मित्र पवन आखाडे यांना बेड्या ठोकल्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com