जाहिरात

वडील काँग्रेसकडून 5 वेळा आमदार, आता लेकीला मंत्रिपद; कोण आहेत मेघना बोर्डीकर?

परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या आमदार भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपद पदी निवड झाली असून काल रात्री आठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करून सांगितल्याची माहिती येत आहे.

वडील काँग्रेसकडून 5 वेळा आमदार, आता लेकीला मंत्रिपद; कोण आहेत मेघना बोर्डीकर?

सागर कुलकर्णी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. आज सकाळपासूनच भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्रिपदाची लॉटरी लागलेल्या नेत्यांना फोन येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपकडून परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या आमदार  मेघना बोर्डीकर यांनाही मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या आमदार भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपद पदी निवड झाली असून काल रात्री आठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करून सांगितल्याची माहिती येत आहे.. मेघना बोर्डीकर या नागपूरच्या दिशेने सध्या रवाना झालेल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोण आहेत मेघना बोर्डीकर?

 मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेतून निवडून आल्यात. मेघना बोर्डीकर यांचे वडील जिंतूरमधून त्यांनी दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली आहे. त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे 5 टर्म आमदार होते.  परभणी जिल्ह्याच्या राजकारणात रामप्रसाद बोर्डीकर यांचे वर्चस्व आहे. ते पाच टर्म काँग्रेसकडून आमदार होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. वडील रामप्रसाद बोर्डीकर यांच्यानंतर आता त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून मेघना बोर्डीकर या भाजपमध्ये सक्रिय झाल्या. 

राजकारणासोबतच बोर्डीकर या एक यशस्वी उद्योजिका आणि  पीडीसीसी बँकेच्या (परभणी) संचालकही आहेत. मेघना बोर्डीकर यांनी डीवाय पाटील विद्यापीठ (पुणे) मधून बीएससी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. मेघना बोर्डीकर यांनी  पुण्यातील DIG म्हणून कार्यरत असलेले IPS अधिकारी दीपक साकोरे यांच्याशी विवाह केला असून त्यांना दोन मुले आहेत. सध्या दोन्ही मुले लंडनमध्ये शिक्षण घेतात. 

ट्रेंडिंग बातमी - अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीला हार्ट अटॅक! शाळेत खेळता खेळता मृत्यू; कुठे घडली घटना?

मेघना बोर्डीकर यांच्याकडे अनुभव आणि पक्षनिष्ठा हा त्यांचा मोठा आधार आहे. त्यांच्या बाजूने स्थानिक नेते, महिला सक्षमीकरण आणि भाजपच्या मतदारसंघीय संघटनात्मक कामाची ताकद आहे. त्यांनी परभणी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

यामध्ये पाणी आणि पर्यावरण संभाषणाला चालना देणे, महिला आणि तरुणांसाठी रोजगार कार्यक्रम निर्माण करणे, वंचित मुलांना शिक्षण देणे आणि दारू व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन कार्यक्रम चालवणे, परभणीला शाश्वत विकास लक्ष्यांकडे नेणे यांचा समावेश आहे. आता त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com