जाहिरात

बदलापुरात इंटरनेट सेवा बंद, बंदोबस्त वाढवला, जमावबंदीही लागू

या सर्व पार्श्वभूमिवर पोलीसांनी आता आवश्यक ती काळजी घेतली आहे. बदलापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शिवाय शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

बदलापुरात इंटरनेट सेवा बंद, बंदोबस्त वाढवला, जमावबंदीही लागू
बदलापूर:

बदलापुरात दोन चिमुकल्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटनेनं लोकांमध्ये उद्रेक निर्माण झाला होता. हा प्रकार ज्या शाळेत घडला त्या शाळेवर आधी आंदोलकांनी हल्लाबोल केला. त्यानंतर रेल्वे सेवाही रोखून धरली. आंदोलनाने हिंसळ वळण ही घेतले होते. त्यातून दगडफेकीच्या घटनाही घडल्या. या सर्व पार्श्वभूमिवर पोलीसांनी आता आवश्यक ती काळजी घेतली आहे. बदलापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शिवाय शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. शिवाय जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बदलापुरातील (Badlapur News) एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या (Badlapur Child abuse) दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारा झाल्याची घटना घडली.  शाळेच्याच 23 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने हे अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली. साडे तीन ते चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. शाळेकडून हे प्रकरण दाबले गेल्याचा आरोप पालकांनी आणि नागरिकांनी केलाय. त्यानंतर जनतेचा संताप अनावर झाला. शहरात बंद पुकारण्यात आला. शाळेला घेराव घालण्यात आला. याशिवाय काही नागरिकांनी बदलापुरात रेल रोको केला. बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणारा मार्ग रोखून धरला होता. 

ट्रेंडिंग बातमी -  Video : बदलापूर पुन्हा हादरलं! बापाचं निर्घृण कृत्य, लेक-पत्नी बसलेल्या गाडीला समोरून जोरदार धडक 

या आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागले. रेल्वे सेवा पुर्ण पणे कोलमडून गेली होती. यावेळी संतप्त जमावाकडून दगडफेकही करण्यात आली. त्यात पोलीसही जखमी झाले होते. या प्रकरणी 300 ते 400 जणां विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. शिवाय 28 जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. कल्याण रेल्वे पोलीसांनी याबाबतचे गुन्हे दाखल केले आहेत. या आंदोलामुळे जवळपास 12 तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. 

ट्रेंडिंग बातमी - अकोल्यातील ZP शाळेतील आठवीतील विद्यार्थिंनींसोबत संतापजनक कृत्य, शिक्षकाचे सहाजणींना...

या प्रकरणी लोकांमध्ये चुकीच्या बातम्या पसरू नये. शिवाय गैरसमज पसरवले जावू नये. यासाठी काळजी म्हणून बदलापुरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्याच बरोबर जमाव बंदीचे आदेशही देण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना  शहरात कुठेही एकत्र जमता येणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. सध्या बदलापुरात तणावपूर्ण शांतता आहे.
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
बदलापुरात इंटरनेट सेवा बंद, बंदोबस्त वाढवला, जमावबंदीही लागू
Woman knifes boyfriend's private parts after he refuses to marry her Thane Bhivandi
Next Article
लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने केले चाकूने वार