जाहिरात

Jaish-e-Mohammed : ड्रोन आणि डिजिटल फंडिंग! पाकिस्तान जैशला बनवतोय अधिक धोकादायक; भारतासाठी वाढले आव्हान

ISIS New Terrorist Plan : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सपाटून मार खाल्लेल्या पाकिस्ताननं भारताविरुद्ध नवा प्लॅन आखला आहे.

Jaish-e-Mohammed : ड्रोन आणि डिजिटल फंडिंग! पाकिस्तान जैशला बनवतोय अधिक धोकादायक; भारतासाठी वाढले आव्हान
Jaish-e-Mohammed : जैश-ए-मोहम्मदची आर्थिक ताकद आता डिजिटल जगावर आधारित आहे.
मुंबई:

ISIS New Terrorist Plan : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये एप्रिल महिन्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या अतिरेक्यांनी पर्यटकांचा धर्म विचारुन त्यांची हत्या केली. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' ही मोहीम राबवली. या मोहिमेत पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यांचं कंबरडं मोडलं. तसंच त्यांना साथ देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराचा सपशेल पराभव झाला. मोठं नुकसान आणि जगभर नाचक्की झाल्यानंतरही पाकिस्तान लष्कर, गुप्तचर संघटना आणि तेथील दहशतवादी शांत बसायला तयार नाही. त्यांनी आता भारताविरुद्ध खतरनाक प्लॅन आखला आहे.

काय आहे प्लॅन?

पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI भारताच्या विरोधात एक नवीन आणि धोकादायक कट रचत आहे. गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनुसार, ISI आता पारंपरिक शस्त्रांऐवजी आधुनिक शस्त्रे आणि हाय-टेक तंत्रज्ञानाने दहशतवादी संघटनांना सुसज्ज करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यात जैश-ए-मोहम्मद आघाडीवर आहे. ही दहशतवादी संघटना क्वाडकॉप्टर आणि आधुनिक ड्रोन मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. जैशला हे तंत्रज्ञान मिळाल्यास सीमापार हल्ल्याचा धोका अनेक पटींनी वाढेल, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केलाय. 

( नक्की वाचा : PM Modi : ट्रम्प यांचा मोदींना चार वेळा कॉल, पण मोदींनी घेतला नाही; ‘या' कारणामुळे घेतला निर्णय? )


पाकिस्तानी सेना देणार प्रशिक्षण

सूत्रांनुसार, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैन्याकडून आधुनिक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. जैश आधीपासूनच मशीन गन, रॉकेट लाँचर आणि मोर्टार सारखी शस्त्रे काळ्या बाजारातून खरेदी करत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI चा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आता ड्रोन आणि क्वाडकॉप्टर मिळाल्याने शस्त्रे तस्करीपासून हल्ले करण्यापर्यंत भारतासमोर नवीन आव्हाने उभी राहू शकतात.

जैश-ए-मोहम्मदची आर्थिक ताकद आता डिजिटल जगावर आधारित आहे. या संघटनेला दरवर्षी 800-900 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांची फंडिंग मिळते, ज्याचा मोठा भाग आखाती देशांमधून येतो. सूत्रांनुसार, हे पैसे आता डिजिटल वॉलेट्सद्वारे येतात आणि जवळपास 50% फंडिंग आधुनिक शस्त्रे खरेदीवर खर्च केली जात आहे.

TTP शी संबंध आणि 'ऑपरेशन सिंदूर' चा बदला

जैशचे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) शी सुद्धा खूप जवळचे संबंध आहेत. TTP ने आधीच ड्रोन हल्ल्यांचा वापर केला आहे आणि आता तेच तंत्रज्ञान जैशलाही मिळू शकते. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्वाचे तळ उद्ध्वस्त झाल्यामुळे जैशचा म्होरक्या मसूद अझहर बिथरला आहे. पाकिस्तानमधील बहावलपूर येथील जैशचे मुख्यालय पुन्हा उभे करण्याची तयारी सुरू आहे. लष्कर-ए-तैयबा, जैश आणि हिजबुल सारख्या दहशतवादी संघटनांनी आपले उद्ध्वस्त झालेले तळ आणि लाँच पॅड पुन्हा उभे करण्यासाठी देणग्याही मागण्यास सुरुवात केली आहे.

भारतासाठी वाढणार चिंता

गुप्तचर सूत्रांच्या अंदाजानुसार हाय-टेक शस्त्रे आणि ड्रोन तंत्रज्ञान दहशतवादी नेटवर्कला पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनवू शकतात. ड्रोनमुळे शस्त्रांची तस्करी सोपी होईल, सीमापार हल्ले अधिक वेगाने होतील आणि सुरक्षा यंत्रणांसमोर नवीन आव्हाने उभी राहतील. भारताच्या विरोधात या कटाचा खुलासा सर्वात आधी एनडीटीव्हीने केला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com