
हरियाणातील रोहतकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन महिन्या पूर्वी गायब झालेल्या एका योगा शिक्षकाचा मृतदेह मिळाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. शिवाय त्यामागचे कारण समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. या शिक्षकाचे अपहरण करून त्याला सात फुट खड्ड्यात जिवंत गाडण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून या हत्येचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जगदीप हे योगा शिक्षक आहेत. ते बाबा मस्तनाथ विद्यापीठात योगा शिकवत होते. ते रोहतकमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहात होता. त्या घर मालकाच्या पत्नीवर त्याचा जीव जडला होता. दोघे ही एकमेकाच्या प्रेमात पडले होते. याची कुणकुण महिलेच्या पतीला लागली. त्याच वेळी त्याने जगदीपचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या मित्राच्या सहाय्याने जगदीपचे अपहरण केले. 24 डिसेंबर 2024 ला हे अपहरण झाले.
अपहरण केल्यानंतर जगदीप याला मारहाण करण्यात आली. त्याचे हात पाय बांधण्यात आले. तो ओरडू नये यासाठी त्याच्या तोंडावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर जगदीपला रोहतक पासून 61 किलोमिटर दूर असलेल्या पैंतावास या ठिकाणी नेण्यात आले. सुनसान असलेल्या जागेवर आधीच एक खड्डा खणून ठेवण्यात आला होता. हा खड्डा जवळपास सात फूट खोल होता. बोअरवेल खोदायची आहे यासाठी हा खड्डा करत असल्याचं आधीच सांगितलं गेलं होतं. त्यामुळे कुणालाही संशय आला नाही.
त्या ठिकाणी नेवून रात्रीच्या वेळीच जगदीप याला जिवंत या खड्ड्यात गाडण्यात आलं. त्यानंतर जवळपास दहा दिवसानंतर ते हरवले असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जगदीप याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो काही सापडला नाही. पण बरोबर तीन महिन्यानंतर जगदीपचा मृतदेह पोलिसांना मिळाला. तीन महिने शोध घेतल्यानंतर आरोपींच्या मोबाईल फोन मुळे या हत्येचा पोलिसांनी उलगडा केली. जगदीपचे कॉल डिटेल्स ही पोलिसांनी तपासले त्यानंतर त्यांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेले आरोपी हे हरदीप आणि धर्मपाल हे आहेत. यांच्याकडे चौकशी केल्यानंतर प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला आहे. जगदीप हा आरोपीच्या घरातच भाड्याने राहात होता. त्यावेळी त्याचे आणि घरमालकाच्या पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू होते. त्याची भनक पतीला लागली. त्यातून त्याने जगदीपच्या अपहरणाचा कट रचला. नंतर त्याला जिवंत गाडण्यात आलं. या खूनचा उकल झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world