
मंगेश जोशी, जळगाव: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत नोकरी लावण्याच्या बहाण्याने जळगावमधील 18 जणांची 55 लाख 60 हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हितेश संघवी व अर्पिता संघवी असे फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. संघवी पती-पत्नी हे मूळचे पाचोरा येथील रहिवासी असून सद्यस्थितीत ते नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती आहे.
या दोघांनी एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे ओळखपत्र, लेटर पॅड व अपॉइंटमेंट लेटर दाखवून जळगावमधील हर्षल बारी या तरुणासह 18 जणांची फसवणूक केली. या सर्वांची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तब्बल 55 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणाने शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शनिपेठ पोलिसांकडून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास केला जात आहे.
Amravati News: 'गिनीज बुक' रेकॉर्डच्या नावाखाली कलाकारांची फसवणूक, 12 लाख उकळल्याचा आरोप
दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीकांत शिंदे तसेच जळगावचे आमदार गुलाबराव पाटील हे माझ्या खूप जवळचे असल्याची बतावणी करून फसवणूक झाल्याचेही उघडकीस आले आहे. नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिषेक प्रभाकर पाटील असं आरोपी युवतीचे नाव आहे. तो मुळचा जळगावच्या जामनेर तालुक्यातील एकुलती गावाचा रहिवासी आहे.सध्या नाशिकच्या द्वारका परिसरात वास्तव्यास आहे.
या आरोपीने पोलीस दलात नोकरी लावून देण्याची आमिष दाखवून निफाडच्या औरंगपूर युवतीच्या आई - वडिलांकडून साडे चार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत फसवणूक झालेल्या स्वाती राजेंद्र चाबुकस्वार या युवतीने दिलेल्या तक्रारीवरून सायखेडा पोलिसांनी अभिषेक प्रभाकर पाटील यास अटक केली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
स्वप्नातलं घर की मृत्यूचा सापळा! बिल्डरकडून फसवणूक, 70 कुटुंबांवर मंदिरात राहण्याची वेळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world