जाहिरात

Jalgaon News: कुत्र्याची दहशत! 11 जणांना चावला 4 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला

त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे तरुणांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले.

Jalgaon News: कुत्र्याची दहशत! 11 जणांना चावला 4 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला
जळगाव:

जळगाव शहरातील समता नगर परिसरात असलेल्या नागेश्वर कॉलनीत 11 जणांना चावा घेणाऱ्या पिसाटलेल्या कुत्र्याने 4 वर्षीय मुलाचा बळी घेतला आहे. अंगणात खेळत असलेल्या 4 वर्षीय अरविंद सचिन गायकवाड या बालकावर पिसाटलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या गळ्याला चावा घेतल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या कुत्र्याने आतापर्यंत परिसरात 11 जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.  परिसरातील कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शहरातील समता नगर नागेश्वर कॉलनी परिसरात राहणारे सचिन गायकवाड यांचा 4 वर्षीय मुलगा अरविंद हा अंगणात खेळत होता. त्याच वेळी पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक अरविंदवर हल्ला केला. त्याच वेळी त्याच्या आवाजाने परिसरातील तरुणांनी धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून अरविंदला सोडवले. मात्र कुत्र्याने अरविंदच्या गळ्याला चावा घेतला होता. 

ट्रेंडिंग बातमी - Political News: सुप्रिम कोर्टाचा दणका! 'ते' दोन टेंडर झाले रद्द, शिंदेंचे टेन्शन वाढणार?

त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे तरुणांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. गेल्या काही दिवसापासून पिसाटलेल्या कुत्र्यांनी परिसरातील 11 जणांना चावा घेवून जखमी केले आहे.  याबाबत परिसरातील नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे तक्रारी देखील करण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांकडून महापालिका प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com