जाहिरात

Jalgaon Crime: भररस्त्यात गाठलं, सासरच्यांनी जायवाला निर्घृणपणे संपवलं, जळगावमध्ये खळबळ

पत्नीच्याच नातेवाईकांनी तरुणावर हा हल्ला करत त्याची हत्या केली आहे. आकाश पंडित भावसार असे हत्या करण्यात आलेल्या आहे.

Jalgaon Crime: भररस्त्यात गाठलं, सासरच्यांनी जायवाला निर्घृणपणे संपवलं, जळगावमध्ये खळबळ

मंगेश जोशी, जळगाव: कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनीच तरुणावर हल्ला करत त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहरात घडलेल्या या भयंकर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आकाश पंडीत भावसर असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून हत्येनंतर आरोपी फरार झालेत. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीच्याच नातेवाईकांनी तरुणावर हा हल्ला करत त्याची हत्या केली आहे. आकाश पंडित भावसार असे हत्या करण्यात आलेल्या आहे.

आकाश भावसार व त्याच्या पत्नीचे कौटुंबिक वाद होते व या वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी आकाशला रस्त्यावर गाठत त्याच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले आहे. या प्रकरणात चार संशयितांची नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा - Pahalgam Attack : भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी; आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी

दरम्यान, अकोला शहरातील तारफाईल परिसरात दुहेरी हत्याकांडने  हृदयाला पिळवून टाकणारी घटना शनिवारी दुपारी समोर आली. पतीने आपली पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी पोहचून आरोपीस ताब्यात घेतले.

PM Narendra Modi : पहलगाम हल्ल्यापूर्वी पंतप्रधान मोदी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? खळबळजनक माहिती समोर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: