जाहिरात

Vicky Patil Murder Case: प्रसिद्ध रीलस्टारच्या हत्या प्रकरणात खळबळजनक ट्वीस्ट! बाप-लेकाला कुणी संपवलं?

Vicky Patil Murder Case Update: सासऱ्यांना शर्टाचे बटनही लावता येत नाही, ते खून कसा करतील, असा सवाल करत चुलत्याने दोघांची हत्या केल्याचा दावा केला आहे.

Vicky Patil Murder Case: प्रसिद्ध रीलस्टारच्या हत्या प्रकरणात खळबळजनक ट्वीस्ट!  बाप-लेकाला कुणी संपवलं?

जळगाव: जळगाव जिल्ह्यामधील प्रसिद्ध रीलस्टार विकी पाटीलची हत्या करुन त्याच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. माजी सैनिक असलेल्या पित्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट मध्ये आपल्या मुलाची आपण हत्या केल्याचे केले स्पष्ट केले होते. तसेच त्याचा मृतदेह नाल्यामध्ये पुरल्याचेही सांगितले होते. या भयंकर घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरुन गेला आहे. अशातच या प्रकरणी विकी पाटीलची पत्नी पायल पाटीलने मोठा दावा केला केल्याने खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात रील स्टार असलेल्या मुलाची हत्या करत माजी सैनिक असलेल्या पित्याने आत्महत्या  केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी सैनिक असलेल्या पित्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये आपल्या मुलाची आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे. प्रसिद्ध रीलस्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय 22, रा. भोरखेडा), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विठ्ठल सखाराम पाटील असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. 

मात्र आता प्रकरणात पत्नी पायल पाटीलने मोठा दावा केला आहे. माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी केली नसून दोघा बापलेकांना काकाने संपवल्याचा धक्कादायक दावा केला आहे. सासऱ्यांना शर्टाचे बटनही लावता येत नाही, ते खून कसा करतील, असा सवाल करत चुलत्याने दोघांची हत्या केल्याचा दावा केला आहे.

(नक्की वाचा-  Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)

महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियावरही विकी पाटीलच्या चाहत्यांकडून असाच दावा केला जात आहे. विकी पाटील आणि त्याच्या वडिलांची हत्या त्याच्या काकाने केली आहे. त्यांचा प्रॉपर्टीचा वाद होता, याच वादातून दोघांनाही संपवण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करुन मृतांना न्याय मिळावा, अशी मागणी त्याचे चाहते करत आहेत. 

दरम्यान, विकी पाटीलचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते. त्यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये "माझ्या मुलाचा खून केला असून, त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे," असे लिहिले होते. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता भोरखेडा गावाजवळील धरणाजवळ त्याचा मृतदेह सापडला. मात्र आता या प्रकरणात नवनवे खुलासे होत असल्याने या प्रकरणाचा गुंता चांगलाच वाढला आहे.

(नक्की वाचा - Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?)