कल्याणमधील एका 12 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करीत तिची निघृणपणे हत्या करण्यात आली. चिमुरडीच्या मृतदेहाच्या गुप्तांगात स्कू ड्रायव्हर घालत विकृतीचा कळस गाठला. यापूर्वी अशाच चार जणींवर त्याने लैंगिक अत्याचार केले, मात्र प्रत्येकवेळी त्याची सुटका होत होती. या प्रकारामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. सराईत गुन्हेगार असतानाही केवळ मानसिक रुग्ण असल्याचा दाखला असल्यामुळे विशाल गवळीची प्रत्येक गुन्ह्यातून सुटका होत होती. त्याला हे दाखले कोण देत होतं, यामागे कोण आहे याचा तपास करण्याची मागणी कल्याणसह राज्यभरातील नागरिकांकडून केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार आणि नंतर तिची हत्या करणारा विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार आहे. राक्षसी प्रवृती असलेला या गुन्हेगाराने यापूर्वी तीन मुलींवर आणि एका मुलावर लैगिंक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे विशाल गवळी याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला आहे. या दाखल्याच्या जोरावर दोन प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे. कल्याणमधील सहा ते सात जणांनी अशा प्रकारचा दाखला घेतल्याची माहिती आहे. कोणी हे दाखले दिले? कोणत्या रुग्णालयातून देण्यात आले? यामागे डॉक्टरांची टीम कार्यरत आहे का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहे.
कोणी या प्रकरणी मदत केली आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केल्याची माहिती आहे. कल्याणमधील लैंगिक आणि हत्येचा आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण न्यायालयात पोलिसांनी युक्तीवाद केला. आरोपी विशाल आणि साक्षी या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली गेली. मुलीचे अपहरण कशा प्रकारे करण्यात आले. त्यात आणखीन कोणी आहे का, आरोपी याने यापूर्वी तीन मुलींवर एका मुलावर लैगिंक अत्याचार केले आहेत. त्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याची आहे. न्यायालयाने विशाल व त्याची पत्नी साक्षीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
नक्की वाचा - Satish Wagh Murder : मुलाचा तरणाबांड मित्र आवडायला लागला, भाजप आमदाराची मामी मोहिनीने नवऱ्याचा 'असा' काटा काढला
या प्रकरणात धक्कादायक खुलासा असा झाला आहे. या पूर्वीच्या दोन गुन्ह्यात विशालची जामीनावर सुटका करण्याकरिता मनोरुग्ण असल्याचा दाखला दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा दाखला कोणी दिला? या प्रकरणात केडीएमसीमधील आरोग्य खाते, ठाणे सिव्हील, उल्हासनगर सरकारी रुग्णालय, सायन रुग्णालय यातील डॉक्टरांची चौकशी केली जाणार आहे. विशाल हा मनोरुग्ण आहे की नाही, त्याचे मेडिकल केले जाणार आहे. विशाल गवळी सारखाच अन्य पाच ते सहा आरोपीनी अशा प्रकारचा दाखला घेतला आहे. हे पाच ते सहा जण कोण आहेत याची माहिती पोलिसांकडे तूर्तास नाही. मात्र त्यांचाही शोध घेतला जाणार आहे. या प्रकरणी भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आरोपीने मनोरुग्ण असल्याचा दाखला कसा काय आणि कोणाकडून मिळविला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे.