अमजद खान आणि निनाद करमरकर, प्रतिनिधी
कल्याणमध्ये 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम आरोपी विशाल गवळी याला एक तर फाशी द्या, अन्यथा त्याला आमच्या ताब्यात द्या, अशा संतप्त भावना कल्याणकरांनी व्यक्त केल्या आहेत. विशाल गवळी याने केलेला हा लैंगिक अत्याचाराचा हा चौथा गुन्हा असून प्रत्येक वेळी तो मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट न्यायालयात सादर करून जामीन मिळवत असल्याची धक्कादायक बाबही पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचं 23 डिसेंबर रोजी सायंकाळी अपहरण झालं होतं. विशाल गवळी याने तिचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. हा नराधम इतक्यावरच थांबला नाही, तर या चिमुकलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर घालत त्याने विकृतीचा कळस गाठला. यानंतर तो आणि त्याच्या पत्नीने मिळून या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि बापगाव परिसरात फेकून दिला. या सगळ्या प्रकरणानंतर विशाल गवळी हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं बायकोच्या माहेरी पळून गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. तसंच त्याच्या पत्नीलाही अटक केली. यानंतर पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
नक्की वाचा - Satish Wagh Murder : मुलाचा तरणाबांड मित्र आवडायला लागला, भाजप आमदाराची मामी मोहिनीने नवऱ्याचा 'असा' काटा काढला
नराधम विशाल गवळी याने केलेला हा लैंगिक अत्याचाराचा पहिलाच गुन्हा नसून यापूर्वीही त्याने दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला आहे. तर एका अल्पवयीन मुलावर त्याने लैंगिक अत्याचार केला आहे. याशिवाय एका व्यक्तीला बेदम मारहाण करणे आणि एक जबरी चोरीचा गुन्हा असे एकूण पाच गुन्हे त्याच्यावर यापूर्वी दाखल आहेत. मात्र दरवेळी मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट न्यायालयात सादर करून तो जामीन मिळवत होता. आणि त्यामुळेच आता हा सहावा अतिशय गंभीर गुन्हा त्याने केला आहे. या सगळ्यात त्याला मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट नेमकं कोणी दिलं? आणि कशाच्या आधारावर दिलं? या दिशेने सुद्धा पोलीस तपास करणार आहेत. तसंच या वेळच्या गुन्ह्यात त्याला या सर्टिफिकेटचा आधार घेता येऊ नये, म्हणून त्याची पुन्हा एकदा मानसिक चाचणी होणार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
विशाल गवळी याला त्याच्या या कृत्यात साथ देणारी त्याची पत्नीही या गुन्ह्यात तितकीच दोषी आहे. विशालची पत्नी साक्षी गवळी ही एका कॉर्पोरेट बँकेत मोठ्या पदावर कार्यरत आहे. २३ डिसेंबर रोजी ती घरी नसताना विशालनं या मुलीचं अपहरण करून तिला स्वतःच्या घरी आणलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केली. मात्र यानंतर त्याची पत्नी साक्षी जेव्हा घरी परत आली, तेव्हा तिला हा प्रकार समजल्यानंतर तिने पोलिसांना याबाबत माहिती देणं अपेक्षित होतं. मात्र तिने आपल्या नराधम पतीची साथ देत या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली. त्यामुळेच पोलिसांनी तिला देखील या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत.
नक्की वाचा - Hingoli Crime : घटस्फोटाची मागणी अन् सासरवाडीत रक्ताचा पाट वाहिला, पोलिसाच्या कृत्याने हिंगोली हादरलं!
या सगळ्या प्रकरणानंतर कल्याण पूर्वेत संतापाची मोठी लाट उसळली आहे. गुरुवारी या मुलीचा मृतदेह तिच्या घरी आणण्यात आला. यावेळेस कल्याणमधील शेकडो नागरिकांनी या मुलीच्या घराच्या परिसरात गर्दी केली होती. यात महिलांची संख्याही मोठी होती. यावेळी नराधम विशाल गवळी याला फाशी द्या, त्याचा एन्काऊंटर करा किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी संतप्त मागणी कल्याणकर महिलांनी केली. इतकंच नव्हे, तर ज्यावेळी या मुलीचा मृतदेह घेऊन ॲम्बुलन्स स्मशानभूमीकडे निघाली. त्यावेळेस ॲम्बुलन्स अडवून संतप्त कल्याणकरांनी आरोपीला फाशी देण्याचीही मागणी केली. या प्रकरणात पोलिसांकडून अतिशय जलद गतीने कारवाई झाल्यामुळे अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र आता हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधम विशाल गवळी याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि मृत पीडित मुलीला न्याय मिळावा, हीच भावना प्रत्येक कल्याणकर व्यक्त करतोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world