जाहिरात

Kalyan Crime: ब्रँडेड बॉटल, बनावट दारु.. कल्याणमध्ये उत्पादन शुल्क विभागाची धाड; गोरख धंदा उघडकीस

नामांकित ब्रँड्सच्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून ती बाजारपेठेत विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश कल्याण एक्साईजच्या भरारी पथकाने केला.

Kalyan Crime: ब्रँडेड बॉटल, बनावट दारु.. कल्याणमध्ये उत्पादन शुल्क विभागाची धाड; गोरख धंदा उघडकीस

Kalyan Crime:  कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये डुप्लिकेट दारू ब्रँडेड बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून बनावट मद्यासह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याणमध्ये मोठी कारवाई!

समोर आलेल्या माहितीनुसार,  कल्याणनजीकच्या टिटवाळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बनावट मद्यनिर्मितीच्या गोरखधंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) हातोडा मारला आहे. नामांकित ब्रँड्सच्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून ती बाजारपेठेत विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश कल्याण एक्साईजच्या भरारी पथकाने केला असून, या कारवाईत १२ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Shocking news: क्रिकेटविश्वात खळबळ! माजी खेळाडूच्या मुलाने घरकाम करणाऱ्या मुलीवर केले अत्याचार

बनावट मद्यसाठा जप्त

टिटवाळा-मांडा परिसरातील एका घरात हा बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने जयेश केणे यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी तिथे परदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरण्याचे काम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणी जयेश केणे आणि रोहन केणे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

​कारवाईदरम्यान पथकाने मोठ्या प्रमाणात बनावट मद्याचा साठा, नामांकित कंपन्यांचे बुच, लेबल आणि इतर साहित्य हस्तगत केले आहे. आरोपी हे स्वस्त दरातील दारू नामांकित ब्रँड्सच्या बाटल्यांत भरून ग्राहकांची फसवणूक करत होते. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास आता एक्साईज विभाग करत आहे.

नक्की वाचा - Nashik News: 'मी माफी मागणार नाही, सस्पेंड केलं तरी चालेल', मंत्र्यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव घेणे टाळलं अन्..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com