जाहिरात

Kalyan News: एका खरेदीनंतर संपले सुखी कुटुंब... कल्याणमधील धक्कादायक हत्येचं कारण उघड

Kalyan News: नातेवाईकांच्या सततच्या टोमणेबाजीमुळे कल्याणमधील एका सुखी कुटुंबाचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे.

Kalyan News: एका खरेदीनंतर संपले सुखी कुटुंब... कल्याणमधील धक्कादायक हत्येचं कारण उघड
Kalyan News: गेल्या काही दिवसांपासून नवरा-बायकोमध्ये सातत्यानं खटके उडत होते.
कल्याण:

Kalyan News: नातेवाईकांच्या सततच्या टोमणेबाजीमुळे कल्याणमधील एका सुखी कुटुंबाचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे. स्वतःच्या गावी पत्नीच्या नावावर जमीन खरेदी करणे एका पतीला आणि त्याच्या कुटुंबियांना इतके खटकले की, त्यावरून झालेल्या वादातून पतीने आपल्याच पत्नीला जीव गमवावा लागेल इतकी अमानुष मारहाण केली. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

हे संपूर्ण कुटुंब गेल्या काही वर्षांपासून कल्याण पूर्व येथील परिसरात राहत होते. या प्रकरणातील आरोपी पती मुबीन खान आणि मृत पत्नी आयशाबानो यांचे 2006 मध्ये झाले होते. एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा सुखी परिवार होता.पण नवरा-बायकोत गेल्या काही दिवसांपासून एका कौटुंबिक कारणावरून सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे त्यांच्या घराची शांतता हरवली होती.

घरगुती वादातून हत्या

या संपूर्ण वादाचे मूळ मुबीन खान याने मध्य प्रदेशातील आपल्या गावी घेतलेल्या एका जागेत होते. मुबीनने ही जागा स्वतःच्या नावावर न घेता पत्नी आयशाबानो यांच्या नावावर खरेदी केली होती. ही गोष्ट मुबीनच्या नातेवाईकांना अजिबात आवडली नव्हती. नातेवाईक वारंवार मुबीनला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून, तू पत्नीच्या नावावर जागा का घेतली? असा सवाल विचारून चिथावणी देत होते. 

( नक्की वाचा : Palghar News : MPSC एकत्र पास झाले, पण एका कारणामुळे बिघडले संबंध, पालघरमध्ये तरुणाचे तरुणीवर सपासप वार )
 

नातेवाईकांच्या या सततच्या त्रासामुळे आणि टोमण्यांमुळे मुबीन चिडला होता आणि त्यावरून तो रोज घरात आयशाबानो यांच्याशी भांडण करत होता.

हाच वाद 10 जून रोजी अत्यंत विकोपाला गेला. नातेवाईकांच्या बोलण्याने चिडलेल्या मुबीन खान याने घरात आयशाबानो यांच्यासोबत जोरदार भांडण सुरू केले. या भांडणादरम्यान त्याचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्याने आयशाबानो यांच्या पोटात आणि शरीरावर लाथा-बुक्क्यांनी अत्यंत अमानुषपणे जबर मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत आयशाबानो गंभीर जखमी झाल्या आणि त्या घरातच कोसळल्या.

आयशाबानो यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सतत उपचार करत होते, मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि उपचारादरम्यानच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बहिणीच्या मृत्यूची माहिती मिळताच आयशाबानो यांच्या भावाने थेट पोलीस ठाणे गाठले. भावाच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी पती मुबीन खान याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com