अमजद खान, प्रतिनिधी
कल्याणमधील परप्रांतीय मराठी वादात अटक असलेले अधिकारी अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी गीता शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या दोघांना आज (शुक्रवार, 27 डिसेंबर) पुन्हा कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने या दोघांसह अन्य पाच आरोपींना 29 डिसेंबरपर्यंत पोलrस कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या आवारात या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना शुक्ला समर्थक आणि एका वकिलांमध्ये जोरदार वाद झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील मराठी तरुणाला मारहाण प्रकरणी अधिकारी शुक्ला आणि त्याची पत्नी गीता आणि ज्या तरुणांनी हल्ला केला होता. सात आरोपींनी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कल्याण न्यायालतात हजर केले. या प्रकरणात जवळपास अर्धा तास सुनावणी झाली. न्यायदंडाधिकारी एस. आर. लांभाते यांच्यासमोर सुनावणी झाली.
न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतला. पाेलिसांच्या मते या गुन्हायात शस्त्रे वापरील आहे. ती हस्तगत होणे बाकी आहेत. न्यायालयाने पोलिसांनी ही मागणी मान्य केली. सर्व आरोपींची दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढविली.
( नक्की वाचा : Kalyan Marathi Man Attack : कल्याणच्या मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेशचा खेळ समाप्त )
एकीकडे ही सुनावणी सुरु असताना दुसरीकडे आरोपीचे समर्थक आणि एक वकिल यांच्यात वाद झाला. वकिल हरीष सरोदे यांनी केलेल्या दाव्यानुसार, आरोपींपैकी एकाने त्यांना डोळे दाखविले. त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. तर शुक्ला समर्थक जयदीप सानप यांनी सांगितले की, हरीष सरोदे हे आमचे चांगले मित्र आहेत. आरोपींच्या तोंडावर बुरखा होता. त्यामुळे डोळे कसे काय दाखविणार? सरोदे यांना सगळे जण ओळखतात. त्यामुळे त्यांना घाबरविण्याचा प्रश्न नाही. या प्रकरणात पोलिस काय गुन्हा दाखल करतात. हे पाहणे महत्वाचे आहे.
न्यायालयात सुरक्षिततेच्या प्रकरणी निष्काळजीपणा केल्या प्रकरणी 11 पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. हे प्रकरण ताजे आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालय काय दखल घेते का हे देखील महत्वाचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world