Kalyan News : कल्याणमधील महाराष्ट्र लॉजमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लॉजमधील एका रूमध्ये एका बहीण-भावाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
कल्याणच्या लॉजमध्ये भावा-बहिणीचा आत्महत्येचा प्रयत्न...
कल्याणमधील स्टेशन समोर महाराष्ट्र लॉज आहे. लॉजमधील एक कर्मचारी एका रूममध्ये गेला. त्याने पाहिलं की, रूममध्ये महिला-पुरुष यांच्या हातातून रक्त वाहत आहे. दोघेही बेशुद्ध आहे. कर्मचाऱ्याने याची माहिती मॅनेजरला दिली. मॅनेजरने तातडीने महात्मा फुले पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलराम सिंग परदेशी लॉजमध्ये दाखल झाले. दोघांना उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणी बाई हॉस्पिटलला पाठवण्यात आले. दोघे बेशुद्ध असल्याने त्यांना रुक्मिणीबाईहून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायात पाठवण्यात आले. दोघांवर उपचार सुरू आहे. दोघांची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे.
याबाबत महात्मा फुले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील बेलसेकर आणि पद्मजा बेलशेखर हे दोघे भाऊ बहीण आहेत. सुनील हा 56 वर्षाचा आहे. तर त्याची बहीण 53 वर्षाची आहे. दोघे आसनगावचे राहणारे आहेत. अनेक दिवसांपासून दोघांकडे काम नाही. बेरोजगार आहेत. काम धंदा नाही, गरीबी आहे. त्यामुळे दोघांनी हे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती आहे. 21 जुलै रोजी दोघे कल्याणमधील महाराष्ट्र लॉजमध्ये आले होते. सध्या दोघांवर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. दोघांनी बेरोजगारीच्या निराशेतून आत्महतेचा प्रयत्न केला की, यामागे आणखी काही दुसरं कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.