जाहिरात

Kalyan News: महिलेला निर्जनस्थळी नेलं,आधी छेडछाड मग लुटलं..चाकू घेऊन फिरणाऱ्या रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार

Kalyan News: कल्याणमध्ये रॅपिडो बाइक टॅक्सी चालकाने महिला प्रवाशासोबत केलेल्या प्रकारामुळे शहर हादरलंय.

Kalyan News: महिलेला निर्जनस्थळी नेलं,आधी छेडछाड मग लुटलं..चाकू घेऊन फिरणाऱ्या रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार
"Kalyan News: रॅपिडो टॅक्सी चालकाचा धक्कादायक प्रकार"
Canva

Kalyan News: कल्याणमध्ये एका 26 वर्षीय महिला प्रवाशाची छेड काढली तसंच तिच्याकडील एक हजार रुपये लुटल्याप्रकरणी रॅपिडो बाइक टॅक्सी चालकाना अटक करण्यात आलीय. पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी (15 डिसेंबर 2025) याबाबत माहिती दिलीय. 

स्कुटर निर्जनस्थळी नेली अन्....

महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठि पोलीस निरीक्षक बलिरामसिंह परदेशी यांनी सांगितले की, "रॅपिडो बाइक टॅक्सी चालक सिद्धेश परदेशीला (वय 19 वर्ष) रविवारी अटक करण्यात आलीय. ही धक्कादायक घटना शनिवारी (13 डिसेंबर) घडली होती. सिद्धेश मागील दीड महिन्यापासून रॅपिडो कंपनीमध्ये कार्यरत आहे. आरोपीने पीडित महिलेला संध्याकाळी 7 वाजता चिकनघर परिसरातून पिकअप केले. संबंधित महिलेने कल्याण रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या जिममध्ये पोहोचण्यासाठी राइड बुक केली. महिला प्रवाशाला इच्छित ठिकाणी सोडण्याऐवजी चालकाने स्कुटर सिंडिकेट परिसरातील पोलीस कॉलनीजवळील निर्जन आणि काळोख असणाऱ्या रस्त्यावर वाहन वळवलं".

Virar Murder : तुरुंगात बसून केली हत्या, विरारमधील बिल्डर हत्याकांडाचा 'तो' सूत्रधार जेरबंद, दाऊदशीही कनेक्शन

(नक्की वाचा: Virar Murder : तुरुंगात बसून केली हत्या, विरारमधील बिल्डर हत्याकांडाचा 'तो' सूत्रधार जेरबंद, दाऊदशीही कनेक्शन)

महिलेच्या पर्समधील एक हजार रुपये चोरले

पोलीस अधिकाऱ्याने पुढे असंही सांगितलं की, महिलेने याबाबत विचारणा केली असता आरोपीने स्कुटर थांबवून महिलेचा हात पकडला आणि तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. तसेच महिलेची पर्स देखील हिसकावली आणि त्यातील एक हजार रुपये काढले. महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आसपासचे लोक जमले आणि त्यांनी आरोपी सिद्धेश परदेशीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्याकडून एक चाकू देखील ताब्यात घेण्यात आलाय.  

Shocking : 'बाबा बाथरुममधून आले आणि एकापाठोपाठ 5 जणांना लटकवलं', 6 वर्षांच्या मुलानं सांगितला खतरनाक प्रसंग

(नक्की वाचा: Shocking : 'बाबा बाथरुममधून आले आणि एकापाठोपाठ 5 जणांना लटकवलं', 6 वर्षांच्या मुलानं सांगितला खतरनाक प्रसंग)

आरोपी सिद्धेश परदेशीला 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय आणि यापूर्वीही अशाच गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता का? या दिशेनंही त्याचा तपास सुरू करण्यात आलाय.  

(Content Source PTI)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com