जाहिरात

Kalyan News : चालत्या ट्रेनमधून महिलेने बाळासह मारली उडी; भयंकर थरार CCTV मध्ये कैद

कल्याण रेल्वे स्थानकावर RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आहे.

Kalyan News : चालत्या ट्रेनमधून महिलेने बाळासह मारली उडी; भयंकर थरार CCTV मध्ये कैद

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकावर RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आहे. ही महिला एक वर्षाच्या बाळाला घेऊन ट्रेनमधून उतरत होती. धावत्या ट्रेनमधून उतरताना तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. यानंतर आजूबाजूचे लोक धावले. घसरलेल्या महिला आणि तिच्या एक वर्षीय बाळाला RPF चे सहाय्यक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी तत्काळ धाव घेत वाचवलं.

उलट दिशेने उतरत असताना भयंकर घडलं...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याण स्थानकात घडली. ही महिला प्रयागराज ते मुंबई असा प्रवास करीत होती. या महिलेचं नाव अंतिमा शुक्ला असं आहे. ती मुलगा सर्वज्ञ शुक्लासोबत मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होती. ट्रेन कल्याण स्थानकात आली असता तिने उतरण्याचा प्रयत्न केला. ही महिला उलट्या दिशेने उतरत होती. त्यावेळी उतरत असताना तिचा तोल गेला आणि ती बाळासह प्लॅटफॉर्मवर पडली. ती रेल्वेगाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मधे जाणार तोच आजूबाजूचे लोक धावले.

नक्की वाचा - Mumbai News : चौघांचा मृत्यू, कलिंगडाची विक्री घटली; कलिंगडामुळे जीव जाऊ शकतो का? आहारतज्ज्ञांनी केलं अलर्ट

तेथे ड्युटीवर असलेले ASI हेमंत भरगुडे यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. एएसआय आणि आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे महिला आणि तिच्या मुलाचा जीव वाचला. “ऑपरेशन जीवन रक्षा” अंतर्गत करण्यात आलेल्या या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे आई-बाळाचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून RPF जवानाच्या धाडसाचे आणि सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com