Kalyan News: 'त्या' 6 महिलांवर मकोका! 20 पीडितांची पोलिसांनी केली सुटका, कल्याण स्टेशन परिसरात काय घडलं?

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसायाचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला असून आरोपींवर धडक कारवाई केली आहे. वेश्या व्यवसायाची टोळी चालवणाऱ्या 6 महिलांवर पोलिसांनी थेट 'मोकोका'अंतर्गत कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Prostitution Racket Busted

Kalyan Crime News Today : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसायाचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला असून आरोपींवर धडक कारवाई केली आहे. वेश्या व्यवसायाची टोळी चालवणाऱ्या 6 महिलांवर पोलिसांनी थेट 'मोकोका'अंतर्गत कारवाई केली आहे.या टोळीने तब्बल 20 महिलांना वेश्या व्यवसायाच्या धंद्यात ढकललं होतं आणि त्यांच्या माध्यमातून या महिला पैशांची कमाई करायच्या. कल्याण पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईमुळे स्टेशन परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.या प्रकरणातील आणखी 3 पुरुष आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दीड महिन्यांपासून विशेष मोहीम राबवली

कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांकडे होती.त्यानंतर कल्याण विभागाचे एसीपी अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलराम सिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने विशेष मोहीम राबवण्यात आली.या कारवाईदरम्यान पोलिसांनी 20 पीडित महिलांची सुटका केली.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, जलमय परिसरातही 'हर हर महादेव'चा जयघोष, Video व्हायरल

फरार असलेल्या तीन पुरुष आरोपींचा शोध सुरू

तपासात गरीब आणि गरजू महिलांना आमिष दाखवून किंवा अन्य मार्गांनी वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सहा महिला आणि तीन पुरुषांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.महात्मा फुले पोलिसांनी सहा महिला आरोपींना अटक केली असून,त्यांच्यावर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. फरार असलेल्या तीन पुरुष आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> Mumbai Pune Rain LIVE: पुण्यात सोमवार पेठेतील धनगर गल्लीत दुमजली वाडा कोसळला