Couple True Love Story Viral Video: 2006 मध्ये प्रदर्शित झालेला विवाह चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. कारण या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत असलेला प्रेम (शाहिद कपूर)हिरोईन पूजासोबत (अमृता राव) लग्नासाठी सर्व मर्यादा ओलांडतो. या चित्रपटात खऱ्या प्रेमाची सुंदर कहाणीच दाखवण्यात आली आहे. अशाचप्रकारची फिल्मी नव्हे, तर एक खरी कहाणी केरळमधून समोर आली आहे.
लग्नाच्या काही वेळापूर्वीच एका व्यक्तीच्या होणाऱ्या पत्नीचा अपघात झाल्या आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी पतीच्या पायाखालची जमिनच सरकली. पण त्याने हार मानली नाही. पतीने रुग्णालयात धाव घेतली आणि होणाऱ्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून लग्नगाठ बांधली. केरळच्या या लव्ह स्टोरीनं इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांनी मनं जिंकली आहे. या कपलचा व्हिडीओ व्हायरल होताच यूजर्सने कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कोचीतील एका रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये कपलचा हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडीओ पाहून यूजर्सने याला ‘विवाह'चित्रपटाचा रिअल लाइफ व्हर्जन'असं म्हटलं आहे. ब्राइड-टू-बी म्हणजेच होणाऱ्या वधूचा कार अपघात झाला.त्यामुळे ती जखमी झाली.पण या परिस्थितीतही दोन्ही कुटुंबीय लग्न रद्द करायला तयार नव्हते.
नक्की वाचा >> Big News : स्मृती मंधानाच्या लग्नात विघ्न! वडिलांना लग्नाच्या ठिकाणीच आला हृदयविकाराचा झटका
डॉक्टर, नर्स आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली
PTI च्या रिपोर्टनुसार, तिथी आणि मुहूर्ताचं महत्त्व लक्षात घेत वराने रुग्णालयातच वधूसोबत लग्न केले. त्याने रुग्णालयातील सर्व अधिकाऱ्यांची परवानगी घेतली. रुग्णालयात दोघांच्या लग्नाच्या विधीप्रसंगी डॉक्टर, नर्स आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. वराने वधू अविनच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. या व्हायरल व्हिडिओने लोकांची मने जिंकली असून युजर्स कमेंट्समध्ये या कपलला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.
இன்று திருமணம் நடக்க இருந்த நாளில் மணப் பெண்ணிற்கு விபத்து நடந்து விட்டது
— Rajini (@rajini198080) November 21, 2025
அவளுக்கு அவன் கொடுத்த வாக்குறுதி உன்னை தான் மன முடிப்பேன் என்று
அவளுக்கு அவன் சொன்னபடியே மருத்துவ மனையில் தாலி கட்டினான் pic.twitter.com/ONrbolQbG7
@rajini198080 नावाच्या युजरने हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत लिहिलं, आज ज्या दिवशी लग्न होणार होते.त्याच दिवशी वधूसोबत एक अपघात झाला.या अपघातामुळे वराल मोठा धक्का बसला. पण तो खचून गेला नाही. त्याने रुग्णालयात जाऊन वधूला धीर दिला आणि तिथेच सर्वांसमोर तिच्यासोबत लग्न केलं.
वधू-वराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आणि साडेतीन हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.या व्हिडीओला कमेंट करत एका युजरने म्हटलं, "अद्भुत, उत्कृष्ट,अप्रतिम,शानदार,छान,उत्साही,सर जी महाराजांना सलाम".दुसऱ्या युजरने म्हटले की." मला वाटते लग्नाच्या वेळी ती शुद्धीत होती.तिने लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो.या जोडप्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world