जाहिरात

Dowry Harassment : दारु, ड्रग्ज, विवाहबाह्य संबंध,... राज्यपालांच्या नातसुनेची कुटुंबीयांविरोधात गंभीर तक्रार

Dowry Harassment : दिव्या गेहलोत यांनी हुंड्यासाठी छळ, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

Dowry Harassment : दारु, ड्रग्ज, विवाहबाह्य संबंध,... राज्यपालांच्या नातसुनेची कुटुंबीयांविरोधात गंभीर तक्रार
Dowry Harassment : गहेलोत यांच्या नातसुनेनं अनेक गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई:

Dowry Harassment : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे नातू देवेंद्र गेहलोत यांच्या पत्नी दिव्या गेहलोत यांनी हुंड्यासाठी छळ, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात मध्य प्रदेशातील रतलाम येथील पोलीस अधीक्षक अमित कुमार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिव्या यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार सादर केली असून, तातडीने कारवाई करण्याची आणि त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीला सुरक्षित परत मिळवून देण्याची विनंती केली आहे. तिच्या सासरच्या लोकांनी उज्जैन जिल्ह्यातील नागदा येथे मुलीला जबरदस्तीने ठेवले असल्याचा दिव्याचा आरोप आहे.

लाखोंच्या हुंड्याची मागणी आणि छळ

दिव्या यांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांचे पती देवेंद्र गेहलोत ( 33), सासरे आणि आलोटचे माजी आमदार जितेंद्र गेहलोत (  55), दीर विशाल गेहलोत (25) आणि सासू अनिता गेहलोत (60) यांनी त्यांच्याकडे 50 लाख रुपये हुंड्याची मागणी करत अनेक वर्षांपासून त्यांचा छळ केला आहे.

29 एप्रिल 2018 रोजी ताल (आलोट) येथे मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या दोघांचे लग्न झाले होते, ज्यात तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह थावरचंद गेहलोतही उपस्थित होते.

( नक्की वाचा : Psycho Killer : भयंकर! फक्त सौंदर्याच्या हव्यासातून महिलेने संपवली 4 मुले! पोटच्या मुलाचीही हत्या )
 

लग्नापूर्वी माहिती दडवली

दिव्या यांनी असा आरोप केला आहे की लग्नापूर्वी तिच्या पतीला असलेले दारूचे व्यसन, अंमली पदार्थांची सवय आणि त्याचे कथित विवाहबाह्य संबंध ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापासून हेतुपुरस्सर लपवण्यात आली होती.

सासरच्या घरी गेल्यावर दिव्याला कळले की तिचा नवरा दारू आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे आणि त्याचे इतर महिलांशी संबंध आहेत. सासरच्या मंडळींकडून शारीरिक अत्याचार, मानसिक त्रास आणि वारंवार हुंड्याच्या रकमेवरून टोमणे मारले जात होते, असे तिने सांगितले.

( नक्की वाचा : Kalyan News : हद्द झाली! कल्याणमध्ये गावगुंड आणि नशेखोरांचे 'राज'; दुकानदार,पत्नीला मारहाणीचा थरार )
 

जीवघेणा हल्ला आणि गंभीर दुखापत

दिव्या यांनी सांगितले की, 2021 मध्ये गर्भधारणेदरम्यान हा छळ अधिकच वाढला. त्यांना अनेकदा जेवण नाकारले जात असे, मारहाण केली जात असे आणि मानसिक त्रास दिला जात असे. मुलगी जन्मल्यानंतरही हा अत्याचार थांबला नाही. यापूर्वी 2019 मध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण "काहीही बदलले नाही, परिस्थिती फक्त बिघडली," असं दिव्या यांनी सांगितलं.

तक्रारीनुसार, 26 जानेवारीच्या रात्री त्यांचे पती दारू पिऊन घरी आले. त्यांनी दिव्या यांना अमानुष मारहाण केली आणि "आज तू पैसे आणले नाहीस, तर मी तुला मारून टाकीन," अशी धमकी दिली. त्यानंतर पतीने आपल्याला गच्चीवरुन ढकलले, ज्यामुळे त्या खाली गॅलरीत पडल्या आणि त्यांच्या मणक्याला, खांद्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. रात्रभर त्यांना वैद्यकीय मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना नागदा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून इंदूर येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले. दिव्या यांचा आरोप आहे की त्यांच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली गेली नाही आणि त्यांच्या वडिलांवर उपचारांसाठी पैसे देण्याचा दबाव टाकण्यात आला.


मुलीला भेटण्यास बंदी

सासरच्या लोकांनी आपल्या 4 वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने ठेवले आहे आणि तिला भेटू देत नाहीत, असा मोठा आरोप दिव्या यांनी केला आहे. नोव्हेंबरमध्ये त्या मुलीला शाळेत भेटायला गेल्या असता, पतीने त्यांना अडवले आणि "तू तुझ्या आई-वडिलांकडून पैसे आणत नाहीस, तोपर्यंत तू मुलीला भेटू शकत नाहीस," अशी धमकी दिली. "फक्त आईच आपल्या मुलाची योग्य काळजी घेऊ शकते... मला माझी मुलगी परत हवी आहे," अशी विनवणी त्यांनी तक्रारीत केली आहे.

दिव्या यांनी त्यांचे आई-वडील रतलाममध्ये राहत असल्याने सुरुवातीला रतलामचे पोलीस अधीक्षक अमित कुमार यांच्याशी संपर्क साधला. पण, बहुतेक घटना नागदा (उज्जैन जिल्हा) येथे घडल्या असल्याने, त्यांना उज्जैनचे महानिरीक्षक (IG) आणि पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.

रतलाम पोलिसांनी मात्र त्यांची अर्ज स्वीकारून तो पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार जितेंद्र गेहलोत यांनी थोडक्यात सांगितले की, "कोणीही कोणावरही आरोप करू शकते. मी सर्व तथ्ये प्रसारमाध्यमांसमोर मांडेन."


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com