
तुम्ही कधी सामूहिक बलात्काराच्या (गँगरेप) आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आरोपींना जामीन मिळाल्यावर नाचताना आणि विजय मिरवणूक (Victory Parade) काढताना पाहिले आहे का?. बहुतेकांनी हे कधीही पाहिलं नसेल. कारण हा काही सामान्य गुन्हा नाही. हा असा गुन्हा आहे, जो केल्यानंतर कोणाचीही झोप उडेल. पण, आम्ही ज्या आरोपींबद्दल सांगत आहोत, त्यांची झोप उडणे तर दूरच, त्यांना आपण किती मोठा गुन्हा केला आहे, त्याचा जराही पश्चात्ताप नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कर्नाटकमधल्या हावेरीमधली ही संतापजनक घटना आहे. हावेरीमध्ये सामूहिक बलात्काराच्या आरोपींना कोर्टातून जामीन मिळाल्यावर, त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विजय मिरवणूक काढली. या मिरवणुकीदरम्यान त्यांच्यासोबत बाईक आणि कारचा मोठा ताफा होता. विजय मिरवणुकीतही त्यांनी जोरदार हुल्लडबाजी केली.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 महिने जुन्या एका प्रकरणात या आरोपींना जामीन मिळाला आहे. कर्नाटकातील हावेरी येथे एका आंतरधर्मीय जोडप्याच्या हॉटेलच्या खोलीत अनेक लोक घुसले होते. आरोपींनी महिलेला ओढून जवळच्या जंगलात नेले आणि कथितरित्या तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपींना अटक केली.
( नक्की वाचा : 'आई मी चिप्स चोरले नव्हते', प्रत्येक पालकासाठी धडा आहे 13 वर्षांच्या मुलाचं शेवटचं पत्र )
या प्रकरणातील आरोपींना कोर्टातून जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर आरोपींनी विजय मिरवणूक काढली. हावेरीमधील अक्की अलूर गावात ही मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान बाईकस्वार तरुणांनी जोरदार हुल्लडबाजी केली. या मिरवणुकीचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी हसताना आणि विजयाचे चिन्ह (victory Signs) दाखवताना दिसत आहेत. आरोपींसोबत हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ पाहून स्थानिक लोकांमध्ये संताप आहे.
( नक्की वाचा : ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं )
हावेरी सत्र न्यायालयाने अलीकडेच सात मुख्य आरोपींना जामीन दिला आहे. यामध्ये आफताब चंदनकट्टी, मदार साब मंडक्की, समीवुल्ला लालनवर, मोहम्मद सादिक अगासिमानी, शोएब मुल्ला, तौसीप छोटी आणि रियाज साविकेरी यांचा समावेश आहे. 26 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटकेनंतर हे सर्व गेली काही महिने न्यायालयीन कोठडीमध्ये होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world