मेहबुब जमादार, प्रतिनिधी
Khopoli Mangesh Kalokhe Murder Case : रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं नाव आल्याची माहिती समोर आलीय. खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून घारे यांना ओळखलं जातं. घारे यांच्यासह राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा प्रवक्ता भरत भगत यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपोली नगरपरिषदेचा निकाल लागल्यानंतर 5 दिवसांतच..
मंगेश काळोखे यांची आज 26 डिसेंबर 2025 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. खोपोली नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे निवडून आल्या. परंतु, निकालाच्या पाच दिवसानंतर मंगेश काळोखे यांची हत्या झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्या हादरून गेला आहे.
नक्की वाचा >> Jalgaon News : जळगाव हादरलं! चौथी मुलगी झाली म्हणून निर्दयी बापाने 3 दिवसांच्या मुलीसोबत केलं भयंकर कृत्य
कर्जतचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरत भगत यांच्यासह इतर आरोपींचाही समावेश
सुनील तटकरे समर्थक रायगड राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे व राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ता भरत भगत (कर्जत) यांच्यासह स्थानिक पराभूत उमेदवार उर्मिला देवकर यांचे पती रविंद्र परशुराम देवकर व धनेश देवकर यांनी कट रचल्याची माहिती आहे. आरोपींमध्ये रविंद्र परशुराम देवकर,दर्शन रविंद्र देवकर,धनेश रविंद्र देवकर (रा.साईबाबानगर,रहाटवडे,खोपोली),सचिन संदिप चव्हाण,रविंद्र देवकर यांचा बाउंसर व इतर 3 जणांचा समावेश आहे.
सुधाकर घारे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. मयत मंगेश काळोखे हे आमदार थोरवे यांचे कट्टर समर्थक होते. तर आरोपी रवींद्र देवकर यांची पत्नी उर्मिला देवकर ह्या राष्ट्रवादी मधून प्रभाग क्र. 3 मध्ये मानसी मंगेश काळोखे यांच्या विरोधात उभ्या होत्या. उर्मिला देवकर यांचा 700 पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world