नागपूर पोलिसांनी रेल्वे स्थानकातून चोरी झालेल्या सहा महिन्याच्या बाळाला 24 तासाच्या आत शोधुन काढलं आहे. कोणतंही लिड हातात नसताना पोलिसांनी हे बाळ शोधून काढलं आहे. विशेष म्हणजे नागपूरात चोरी झालेले हे बाळ परराज्यात नेण्यात आले होते. एखाद्या चित्रपटाला शोभेल असेच हे अपहरण नाट्य होते. मात्र पोलिसांनी या चिमुरड्याची सुटका करून त्याच्या आई वडिलांच्या कुशीत दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना सहा जुनला घडली. नागपूर रेल्वे स्थानकात भिक्षेकरी असलेले एक दाम्पत्य झोपले होते. त्यांच्या जवळ त्याचे सहा महिन्याचे बाळही होते. पण जेव्हा या दोघांना जाग आली तेव्हा ते बाळ त्यांच्या जवळ नव्हते. ते पाहून हे दाम्पत्य हादरले. त्यांनी बाळाचा शोध घेतला पण त्यांना ते भेटले नाही. शेवटी त्यांनी पोलिस स्थानकात गाठले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्या वेळी काही गोष्टी समोर आल्या. त्यात एक तरूण दाम्पत्य त्यांना भेटले होते. त्यांना त्यांना दहा रूपये ही दिले. शिवाय त्यांना जेवणही दिले. मात्र त्यानंतर हे दाम्पत्य बेपत्ता झाले.
हेही वाचा - पुरेपूर कोल्हापूर! पैज जिंकली अन् मिळवल्या 8 बोकडाच्या मुंड्या, 32 पाय, रोख रक्कम
पोलिसांनी या जबाबाच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात त्यांना एक महिला बाळाला उचलून घेवून जात असल्याचे दिसले. त्या महिलेला भिक्षा मागणाऱ्या दाम्पत्याने ओळखले. पण तिचे नाव, गाव त्यांना काहीच माहित नव्हते. त्यामुळे बाळाची चोरी करणारे ते दाम्पत्य कोण? त्यांना कसे शोधायचे? असा प्रश्न पोलिसां समोर होता. पोलिसांनी अजून चौकशी केली. त्यानंतर त्यांना महत्वाचा धागा मिळाला.
हेही वाचा - बर्डथे सोबत, मृत्यूवेळीही एकत्रच; उत्तराखंड ट्रॅकिंग दुर्घटनेत जीव गमावलेल्या दाम्पत्याची करूणादायी कहाणी
त्या दाम्पत्याने बाळाच्या बापाला खाऊ पिऊ घातले होते. त्यावेळी त्यांनी त्याचे बिल मोबाईलवरून भरले होते. डिजिटल पेमेंट केल्यामुळे ते कोण असतील हे समजणे सोपे जाणार होते. त्यानुसार पोलिसांनी माहिती गोळा करण्याचे काम केले. त्यानुसार त्याचे धागेदोरे थेट तेलंगणा पर्यंत पोहोचले. पोलिसांचेही एक पथक तेलंगणात गेले. तेलंगणाच्या मांचेरियाल येथे हे पथक गेले. तिथे त्यांना एका दाम्पत्याकडे हे बाळ दिसून आले.
हेही वाचा - अग्रवाल पिता-पुत्रांवर आणखी एक गुन्हा दाखल, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार
बाळाचे अपहरण करणाऱ्या जोडप्याला तेलंगणाच्या मंचेरीयाल येथे अटक करण्यात आली. बाळाला ताब्यात घेण्यात आले. चोवीस तासाच्या आत बाळाला सुखरूप परत आणून त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात नागपूर पोलिसांना यश आले. याचे श्रेय पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक मनीषा काशीद, पोलिस सहायक निरीक्षक जावेद शेख आणि त्यांच्या पथकाला जाते. ज्या पद्धतीने आणि दिशेने नागपूर रेल्वे पोलिसांचा तपास सुरू आहे, त्यावरून अशा लहान बाळांचे अपहरण करून त्यांना विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सुगावा लागू शकतो, असा अंदाज आहे.