कल्याणी नगर अपघात प्रकरणी आता नवीन अपडेट समोर येत आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अग्रवाल पिता-पुत्रावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर अपघातप्रकरणी आरोपी मुलाचे आजोबा आणि वडील सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्रासह पाच जणांवर, बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कल्याणीनगर अपघातप्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांसह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाली, त्यामुळे अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 41 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने 9 जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे यांच्यावर जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नक्की वाचा - पुण्यातील शनिपारमधील मुलींच्या वसतिगृहाला आग; एकाचा मृत्यू, 42 जणी बचावल्या
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात, सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 306, 504 आणि 506 नुसार चंदननगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world