कोल्हापुरातील मुडशिंगी गावात (Kolhapur News) विहिरीत मंदीर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. 22 वर्षांपासून विहिरीच्या काठाला असलेलं मंदिर कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या मंदिरात एक ग्रामस्थ पूजा करण्यासाठी गेले असता ते देखील यामध्ये बुडाले.
याबाबत अधिक माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी या गावात कृष्णात उमराव दांगट यांची शेती आहे. या शेतात त्यांची जुनी विहीर आहे. याच विहिरीच्या काठाला नृसिंह देवाचं छोटस मंदिर होत. सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास दांगट या मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान काठावरचं मंदिर कोसळलं. यामध्ये दांगट हे देखील बुडाले. ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि गांधीनगर पोलीस दाखल झाले. बुडालेल्या दांगट यांची शोधमोहीम सुरू झाली. या विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने दांगट यांना शोधण्यात बचाव पथकाला अडचण येत आहे.
नक्की वाचा - होम स्टे नाकारला; हरिहरेश्वरमध्ये पुण्यातील पर्यटकाने महिलेला चिरडलं, जागीच मृत्यू
कशामुळे बुडाले मंदिर?
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळं गडमुडशिंगी या गावातील ओढे नाले भरून वाहत आहेत. विहिरीच्या पाण्यातही हळूहळू वाढ झाली. विहिरीच्या काठाला नृसिंह मंदीर गेल्या 22 वर्षांपासून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याशेजारी असलेल्या या मंदिराचा पाया जीर्ण झाला होता. त्यात 20 ऑक्टोबरला सकाळी अचानकपणे मंदिराचा पाया ढासळला. ही घटना समजल्यानंतर काँग्रेस नेते ऋतुराज पाटील घटनास्थळी दाखल झाले. अशा प्रकारच्या अडचणीत असलेल्या मंदिराबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world