जाहिरात

Road accident: गेल्या 5 वर्षात रस्ते अपघातात किती बळी? आकडा विचार करायला भाग पाडेल

खराब रस्ते हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे नागमणी पांडे यांनी सांगितले. अनेक शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.

Road accident: गेल्या 5 वर्षात रस्ते अपघातात किती बळी? आकडा विचार करायला भाग पाडेल
नवी मुंबई:

प्रथमेश गडकरी

रस्ते अपघातांमध्ये घट न झाल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी संसदेत माफी मागितली होती. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच गडकरी यांनी रस्ते अपघातातील जखमींवर कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली. त्यांनी रस्ते अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना 25 हजार रुपयांचे बक्षीस ही जाहीर केले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रस्ते अपघात आणि त्यात बळी गेलेल्यांची आकडेवारी समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जी आकडेवार समोल आली आहे, ती अतिशय धक्कादायक आहे. 2020 पासून आतापर्यंत राज्यात तब्बल 1 लाख 59 हजार रस्ते अपघात झाले आहेत. त्यात जवळपास  71  हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रफुल्ल जाधव यांनी दिली आहे. ही माहिती नागणी पांडे यांनी आरटीआयद्वारे मागितली होती. या सर्व अपघातामध्ये 1 लाख 30 हजार 718 जण जखमी झाले आहेत. रस्ते अपघातातील जखमींना मदत मिळण्यास उशिर झाल्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागल्याचेही समोर आले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - MLA Salary: आमदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकाल तर म्हणाल...

अप्पर पोलीस महासंचालक प्रफुल्ल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 ते 2024 या काळात राज्यातील 45 पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 1 लाख 59 हजार रस्ते अपघातांमध्ये 71 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. वर्षानुसार रस्ते अपघातांचा विचार केल्यास, रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी वाढ झाली आहे. असं माहित अधिकार कार्यकर्ते नागमणी पांडे यांनी सांगितले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde: फडणवीस- शिंदेंना अडकवण्याचा प्रयत्न? SIT चौकशीत धक्कादायक माहिती, टेन्शन कुणाचे वाढणार?

2020 मध्ये 24 हजार 971 रस्ते अपघातांमध्ये 11 हजार 569 लोकांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 19 हजार 914 जण जखमी झाले होते. 2024  मध्ये 36 हजार 84 रस्ते अपघातांमध्ये 15 हजार 335 लोकांचा मृत्यू झाला. तर 30 हजार 730 जण जखमी झाले होते. अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 43.73 टक्के ऐवढे असल्याचे ही यात समोर आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात अपघातात मृतांच्या संख्येत कमी येण्या ऐवजी वाढ होतानाच दिसत आहे. त्याची कारणे ही आता समोर आली आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Rohit Sharma: एका रोहितसाठी दुसरा रोहित सरसावला, मित्रपक्ष असूनही काँग्रेसवर तुटून पडला

खराब रस्ते हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे नागमणी पांडे यांनी सांगितले. अनेक शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यांवरील भेगा आणि खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत. मुख्य रस्त्यांवरही खड्डे असल्यामुळे दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही.  ते रस्त्यावर पडतात, त्यामुळे मागून येणाऱ्या मोठ्या गाड्यांच्या ते खाली येण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने रस्त्यांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले.