जाहिरात

Nora Fatehi Car Accident:नोरा फतेहीच्या कारला भीषण अपघात, Sunburn फेस्टिव्हलमध्ये जाताना घडली घटना

Actress Nora Fatehi Car Accident: मुंबईतील आंबोली येथील लिंक रोडवर हा अपघात झाला. या अपघातात नोरा किरकोळ जखमी झाली असून तिच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Nora Fatehi Car Accident:नोरा फतेहीच्या कारला भीषण अपघात, Sunburn फेस्टिव्हलमध्ये जाताना घडली घटना
Actress Nora Fatehi Car Accident

Actress Nora Fatehi Car Accident: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील आंबोली येथील लिंक रोडवर हा अपघात झाला. या अपघातात नोरा किरकोळ जखमी झाली असून तिच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, तिची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचारानंतर तिने आपले नियोजित कार्यक्रम पूर्ण केले आहेत.

नेमकी घटना काय?

नोरा फतेही शुक्रवारी मुंबईत आयोजित Sunburn म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जात होती. तिची कार लिंक रोडवरून जात असताना, एका भरधाव कारने तिच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की नोराच्या कारचे नुकसान झाले आणि तिलाही किरकोळ जखमा झाल्या.

मद्यधुंद चालकाचे कृत्य

याप्रकरणी पोलिसांनी विनय सकपाळ नावाच्या 27 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार, विनय हा कार चालवताना दारूच्या नशेत होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याने नोराच्या कारला धडक दिली तेव्हा त्याचे गाडीवर नियंत्रण नव्हते. आंबोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर रॅश ड्रायव्हिंग आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अपघातानंतरही सनबर्नमध्ये परफॉर्मन्स

अपघातानंतर नोराला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला प्रथमोपचार देण्यात आले. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्यानंतर, नोराने धैर्याने आपल्या कामाला प्राधान्य दिले. अपघाताच्या धक्क्यातून सावरून तिने सनबर्न फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. तिच्या या प्रोफेशनलिझमचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com