
माणिकराव कोकाटेंसह धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा जोरदार आग्रह आहे. शिंदेंच्या काळातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. त्यात भर म्हणून राज्यात महिलांच्या अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय मंत्र्याची मुलगीही सुरक्षित नाही. राज्याची आर्थिक स्थिती ही खालावलेली आहे. असा स्थितीत महायुती सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशात बॅकफूटवर दिसत आहे. अशाच वेळी आता महाविकास आघाडी सरकार काळातील एक प्रकरण सत्ताधाऱ्यांनी पुढे केले आहे. त्यातून काऊंटर अटॅक करण्याची रणनिती महायुती सरकारची दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. याबाबतची एक क्लिप भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी समोर आणली होती. याबाबत आता एसआयटी चौकशी होत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या चौकशीत जे काही समोर येत आहे ते अतिशय धक्कादायक आहे असंही शिंदे म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - MLA Salary: आमदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकाल तर म्हणाल...
एसाआयटी चौकशीत जी माहिती समोर येत आहे ती अतिशय गंभीर आहे, असं शिंदे म्हणाले. क्लिपमध्ये आवाज कुणाचा आहे ते ही लवकरच समजेल असंही ते म्हणाले. याबाबत लवकरच एसआयटीचा अहवाल समोर येईल. यात ठाकरे गटाचे कुणी आहे का? असा प्रश्न शिंदेंना करण्यात आला. त्यावर आताच आपण काही बोलणार नाही. पुढे काय होतं ते बघा असं त्यांनी सांगितलं. एसआयटीचा अहवाल आल्यानंतर दुध का दुध पानी का पानी होईल असं ही ते म्हणाले. मात्र या माध्यमातून आपल्याला आणि फडणवीसांना फसवण्याचा डाव होता असं त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधानभवनात का पोहोचले?
विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. विधानसभेत शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळेल असं बोललं जात आहे. त्यात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. सध्या महाविकास आघाडीत एकमत नाही. ते एकमेकाच्या तंगड्यात तंगड्या घालत आहेत. आघाडी आहे की बिघाडी आहे असा प्रश्न आहे. पण ती महाराष्ट्र विरोधी आघाडी आहे येवढं नक्की असंही शिंदे यावेळी म्हणाले.
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आली. हे प्रकरण दुर्दैवी आहे. शिवाय ते गंभीर ही आहे. या प्रकरणातील आरोपी हे कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहीजे हे आपले मत आहे असं ही एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान अबू आझमी यांनी औरंगजेबा विषयी केलेल्या वक्तव्याचा शिंदे यांनी निषेध केलाय.अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. औरंगजेबाचं कौतूक करणं हे महापाप आहे असं ते म्हणाले. त्यामुळे आझमी यांनी माफी मागितली पाहीजे, असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world