
लातूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हत्या, मारहाणीच्या घटनांनी कळस गाठला आहे. बीडमधील भयंकर मारहाणीचे नवनवे व्हिडिओ समोर येत आहेत. अशातच आता लातूरमध्ये भररस्त्यात तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुनच विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडनंतर लातूर जिल्ह्यात भररस्त्यात पाच जणांनी एकाला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बारमध्ये झालेल्या भांडण थेट रस्त्यावर येत पाच जणांच्या टोळक्याने एकाला ही मारहाण केली. लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजश्री बारजवळ मारहाणीच्या घटनेचा थरार घडला आहे. बारमधील भांडण रस्त्यावर आलं अन् पाच तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली.
मारहाण करताना काठी, दगड आणि बेल्ट वापर करण्यात आल्याचे व्हिडिओतून दिसून येते. त्यामुळे, लातूर आंबेजोगाई रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. दिवसाढवळ्या अशा पद्धतीची हाणामारी लातूरसाठी नवीन आहे. तिथे हजर असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडिओ स्वताच्या मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर, समाज माध्यमावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
नक्की वाचा : Maharashtra Budget 2025 : कसा आहे राज्याचा अर्थसंकल्प? 5 मुद्यातून समजून घ्या संपूर्ण बजेट! )
घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले आहे. तोपर्यंत जखमी व्यक्तीला स्थानिकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, यावरुनच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत म्हटल्यावर असा उन्माद होणे स्वाभाविक आहे! अटकपूर्व जामीनांसाठी वकिलांची फौज, राजकीय आकांचे मार्गदर्शन. अटक झाली तरी जेलमध्ये VIPट्रीटमेंट द्यायला कर्मचारी तयार.. पिझ्झा–बर्गर, PA, मोबाईल सगळ्या सुविधा जेलमध्ये ही हात जोडून, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत म्हटल्यावर असा उन्माद होणे स्वाभाविक आहे..!
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 11, 2025
अटकपूर्व जामीनांसाठी वकिलांची फौज, राजकीय आकांचे मार्गदर्शन.. अटक झाली तरी जेलमध्ये VIPट्रीटमेंट द्यायला कर्मचारी तयार..
पिझ्झा–बर्गर, PA, मोबाईल सगळ्या सुविधा जेलमध्ये ही हात जोडून.. #गावागावातीलखोक्यागँग pic.twitter.com/voQ3TIgqjU
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world