सुनिल कांबळे, लातूर: नारळाच्या वाटणीवरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. राजेंद्र गिरी असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतातील नारळाच्या झाडावरील नारळ तोडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मित्रांमध्ये नारळाच्या वाटणीवरून किरकोळ वादातून एका चौदा वर्षीय मुलाला त्याच्या मित्राने गळ्यावर कोयत्याने वार केल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लातूरच्या भादा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
औसा तालुक्यातील कमालपूर येथील रितेश राजेंद्र गिरी (वय14) हा इयत्ता आठवी वर्गात शिकत होता. तो गावातील अन्य दोन अल्पवयीन मित्रांसोबत गावाशेजारी एका शेतातील नारळाच्या झाडावरील नारळ तोडण्यासाठी रात्री साडेआठ वाजता गेला. दरम्यान तिघा मित्रांनी सदर झाडावरील नारळ तोडल्यानंतर नारळाची वाटणी करण्यावरून वाद सुरू झाला.
यावेळी एका मित्राने हातातील कोयत्याने रितेश गिरी याच्या गळ्यावर वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या रितेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी भादा पोलिसांनी धाव घेतली.याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला भादा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा - Nashik accident: नाशिकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
दुसरीकडे कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये दारुच्या नशेत पतीनेच पत्नीचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. दारुच्या नशेत पत्नीसोबत झालेल्या वादानंतर त्याने गळ्यावर वार करत पत्नीची हत्या केली. मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world