Latur News: अल्पवयीन तरुणीला गुंगीचं औषध दिलं, दारुही पाजली, अत्याचार करतानाचा व्हिडीओ काढला, अन् पुढे...

एक दिवस तो त्या तरुणीला घेवून लॉजवर गेला. तिथेच तिला त्याने गुंगीचे औषध दिले. दारू ही पाजली. त्याच अवस्थेत त्याने तिच्याबरोबर शरिर संबंध प्रस्थापित केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
लातूर:

विष्णू बिरगे

महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता लातूर जिल्ह्यातल्या मुरुड येथे एका अल्पवयीन बंगाली मुलीवर दारू पाजून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या तरुणांनं हे कृत्य केलं आहे. मुरुड येथील एका अल्पवयीन मुलीला त्याने दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे. तर  पुढील तपास लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. 

पोटाची खळगी भरण्यासाठी एक बंगाली कुटुंब लातूर जिल्ह्यातील मुरूड इथं आलं होतं. या कुटुंबात एक अल्पवयीन तरुणी होती. तिचे वडील मिळेल ते काम करुन कुटुंब चालवत होतं. तर ही तरुणी एका महाविद्यालयात शिकत होती. एक दिवस फोटो काढण्यासाठी ती एका फोटो स्टुडीओत गेली होती. तिथे तिची आरोपी तरुणी बरोबर ओळख झाली. त्यानंतर या दोघांची ओळख वाढत गेली. या ओळखीचा गैरफायदा त्या तरुणाने घेतला. 

नक्की वाचा - Viral Video: दिसायला हायफाय, पण लोकलचं तिकीटच नाय! विनातिकीट महिलेचा तमाशा

एक दिवस तो त्या तरुणीला घेवून लॉजवर गेला. तिथेच तिला त्याने गुंगीचे औषध दिले. दारू ही पाजली. त्याच अवस्थेत त्याने तिच्याबरोबर शरिर संबंध प्रस्थापित केले. तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने शरिर संबंध करतानाचा व्हिडीओ ही काढला. या व्हिडीओच्या माध्यमातून तो तरुण तिला वारंवार ब्लॅकमेल करून तिचे शोषण करत होता. पुढे तर त्याने कहरच केला. शरिर संबंधाचा व्हिडीओ त्याने थेट त्यामुलीच्या वडीलांनाच पाठवला. त्यामुळे त्या मुलीची बदनामी झाली. 

नक्की वाचा - Couple Video : धावत्या बाईकवर पुण्यातील जोडप्याचा रोमान्स, दुचाकीवरच्या टाकीवरील महिलेनं जे केलं.... पाहा Video

तातडीने पीडित तरुणी आणि तिच्या वडीलांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. शिवाय झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनीही गांभीर्य लक्षात घेत गुन्हा नोंदवून घेतला आहे. शिवाय दोन आरोपींना अटकही केली आहे. या आरोपीने आणखी काही मुलींना अशाच पद्धतीने फसवल्याची माहितीही समोर येत आहे. मुलींना फसवून त्यांचे व्हिडीओ काढून तो त्यांना ब्लॅकमेल करत असे. शिवाय त्यांचे शारिरीक शोषण ही करत असे अशी माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

Advertisement