
विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अनेक वेळा दिसतात. त्यांची संख्या ही मोठी आहे. त्यांना पकडण्यासाठी मग रेल्वे ही वेगवेगळ्या मोहिमा राबवत असते. त्यातून अनेक जण गळाला लागतात. त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो. या दंडाची रक्कमही मोठी असते. अनेक जण तर बारीक निरिक्षण करून हा दंड कसा भरावा लागणार नाही, किंवा आपण कसं पकडले जाणार नाही याचीही तयारी करतात. पण हे सर्व करून ही काही जण पकडले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ थोडा खास आहे.
साधारण पणे विनातिकीट प्रवास कोण करतो, त्याचा एक समज तयार झाला आहे. जो गरिब आहे. जो मुंबईत नवखा आहे. किंवा जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असे लोक अनेक वेळा तिकीट काढताना दिसत नाही. पण आता त्यात आणखी एक कॅटेगिरी अॅड करावी लागणार आहे. जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात एक मुलगी दिसत आहे. ही मुलगी दिसायला हायफाय दिसत आहे. एखाद्या कॉर्पोरेट ऑफीसला काम करणाऱ्या मुली सारखे तिचे ड्रेसिंग आहे. कुणी ही तिला पाहीलं तर तिच्याकडून तिकीट मागावं की नाही असा प्रश्न पडेल.
कदाचीत त्याचाच तिला आत्मविश्वास नाही तर अतिआत्मविश्वास असावा. ती लोकलमधून उतरली. नंतर आपल्या मार्गाने ती रेल्वेच्या फुटओव्हर ब्रिजवरून जात होती. त्याच वेळी तिला टीसीने हटकलं. तिच्याकडे तिकीट मागितलं. तिथेच ती तरुणी फसली. तुझं तिकीट दाखव असं त्यानी तिच्याकडे विचारणा केली. त्यावर जरा माझ्याकडे बघा. माझी कंडीशन बघा. मला घाई आहे असं उडवा उडवीचं उत्तर दिलं. टीसी आपल्याला सोडेल असं तिला वाटत होतं. पण तिचा अंदाज चुकला. टीसीने तिला पुन्हा तिकीट मागितीलं. तिकीट असेल तर ती देणार ना अशी स्थिती तिची झाली होती.
( नक्की वाचा : Population crisis : घटत्या लोकसंख्येवर अजब उपाय! 'या' देशात विद्यार्थिनींना गर्भवती झाल्यावर मिळणार 1 लाख रुपये )
मग तिने आपला हुकमी एक्का खेळला. तिने रेल्वे स्थानकातच तमाशा करण्यास सुरूवात केली. जोरजोरात ओरडू लागली. आपण किती चांगले आहोत ही सांगत होती. शिवाय फाडफाड इंग्रजीतून संवाद फेक सुरू होती. टीसीही त्याच तोडीचा होता. तो ही इंग्रजीतून तिला त्याच पद्धतीने उत्तर देत होता. हा सर्व तमाशा सुरू होता. त्यावेळी एका प्रवाशाने हा व्हिडीओ तयार केला. सध्या हाच व्हिडीओ सर्वंत्र जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस ही पडला आहे. विशेष म्हणजे टीसी शेवटपर्यंत बधले नाही, ते तिला वारंवार सांगत होते की, दंड भरा आणि जा!
Viral Video | रेल्वे स्थानकात विनातिकीट महिलेचा तमाशा...| NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) August 4, 2025
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका महिलेला पकडल्यानंतर तिने काय तमाशा केला ते पाहा. टीसींनी तिला तिकीट कुठाय असं विचारलं असता तिने "माझी कंडीशन बघा, मला घाई आहे." असं… pic.twitter.com/RPcprdIjVn
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world