Fraud News: भिकारी दिसा अन् पैसे कमवा! फसवणुकीचा अजब प्रकार उघडकीस; महिलेचे दागिने लुटले

आरोपीनी फुसवणूक झालेल्या व्यक्तींना निर्जनस्थळी नेत त्यांच्याकडे असलेली सगळी रक्कम, अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगितले. भिकारी दिसण्यासाठी हे गरजेचं असल्याचं सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई:  पैसे कमवण्यासाठी कोण कसं डोकं लावेल काही सांगता येत नाही. चोरीचे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत असून दिवसेंदिवस पैसे कमावण्याचे अनेक धोकादायक अन् अजब प्रकार समोर येत आहेत. याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून भिकारी दिसा अन् पैसे कमवा म्हणत घोटाळेबाजांनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधल्याचं उघडकीस आलं आहे.

या प्रकरणात खार पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दोन महिलांना फसवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आपला मालक मुलगा झाल्याने पैसे दान करतोय अशी थाप आरोपीनी मारली होती. आरोपीनी फुसवणूक झालेल्या व्यक्तींना निर्जनस्थळी नेत त्यांच्याकडे असलेली सगळी रक्कम, अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगितले. भिकारी दिसण्यासाठी हे गरजेचं असल्याचं सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गरीब असल्याचं दिसलं तरच मालक पैसे देईल अशी थाप मारली. यानंतर आरोपीनी या महिलांकडचे दागिने गुपचूप चोरले. 73 वर्षाच्या महिलेचे साडेतीन तोळ्याचे दागिने चोरले.  आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अर्जुन काळे आणि बालाजी पवार अशी आरोपीची नावे असून ते फुटपाथवर राहणारे आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकारी चर्चेत आला होता. भरत जैन हा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी असून त्याची संतप्ती जवळपास 7.5 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. भरत जैन हे भीक मागून एका महिन्याला 60 ते 70,000 इतकी कमाई करतात. भरत जैन यांच्याकडे मुंबईत 1.4 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट आहेत. तर, ठाण्यात त्यांनी दोन दुकाने खरेदी केली आहेत. 

Advertisement

नक्की वाचा : (भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन )