जाहिरात

Former PM Manmohan Singh passed away : भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन

Economist Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी कलाटणी मिळाली.

Former PM Manmohan Singh passed away : भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन
नवी दिल्ली:

Former prime minister Manmohan Singh passed away : भारताचे 14 वे पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्री डॉ.  मनमोहन सिंग यांची आज प्राणज्योत मालवली. ते 92 वर्षांचे होते. आज 26 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुप्फुसाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या दरम्यान पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी कलाटणी मिळाली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1991 ते 1996 या काळात मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचे वित्त धोरण बजावले, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला. आज परदेशी गुंतवणूक हा आजचा परावलीचा शब्द बनलाय. त्याचे प्रणेते डॉ. मनमोहन सिंह होते. 90च्या दशकाच्या सुरुवातीला उद्योग आणि व्यापाराचं धोरण बदलून देशभरच्या अर्थव्यवस्थेला कृषी प्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योग प्रधान किंवा सेवा प्रधान अर्थव्यवस्था बनवण्यात मनमोहन सिंहांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा होता. अर्थमंत्री आणि पंतप्रधान होण्याआधी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील काम पाहिलं. 

GST Council Meet : विमा धारकांच्या पदरी पुन्हा निराशा, जीएसटी परिषदेत कोणताही निर्णय नाही

नक्की वाचा - GST Council Meet : विमा धारकांच्या पदरी पुन्हा निराशा, जीएसटी परिषदेत कोणताही निर्णय नाही

मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर, 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी पंजाबमधील होशियारपूर येथे अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर 1952 आणि 1954 मध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातूनही शिक्षण घेतलं.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com