जाहिरात

Weakest Password: 7 मिनिटात 900 कोटींची चोरी, जगप्रसिद्ध संग्रहालयाचा पासवर्ड पाहून डोक्याला हात लावाल!

चोरीच्या आरोपाखाली चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Weakest Password: 7 मिनिटात 900 कोटींची चोरी, जगप्रसिद्ध संग्रहालयाचा पासवर्ड पाहून डोक्याला हात लावाल!
Louvre Museum Weakest Password
पॅरिस:

फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या ज्या लूव्र म्युजियममध्ये (Louvre Museum) चोरांनी ७ मिनिटांच्या आत ९०० कोटींहून अधिक किमतीचे दागिने चोरले. तेथील सुरक्षा कॅमेऱ्याचा पासवर्ड अत्यंत कमकुवत होता. तुम्हा याचा अंदाज लावू शकता? तो पासवर्ड ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाव. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, चोरीच्या वेळी त्या जगप्रसिद्ध संग्रहालयाच्या व्हिडिओ मॉनिटरिंग सिस्टिमचा पासवर्ड Louvre होता. म्हणजे संग्रहालयाचं नाव हेच पासवर्ड होतं. यामुळे संग्रहालयाच्या सुरक्षा प्रणालीवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. 

अवघ्या ७ मिनिटात चोरी

अमेरिकी टीवी नेटवर्क एसीबीने सांगितलं, फ्रान्सच्या तपासकर्त्यांनुसार, संपूर्ण चोरी अवघ्या ७ मिनिटात करण्यात आली. Louvreच्या संचालकांनी सांगितलं, अपोलो गॅलरीमध्ये लावलेली सुरक्षा रक्षक प्रणाली नव्या प्रकारच्या हल्ल्यांसाठी कशाप्रकारे तयार करण्यात येईल यासाठी विचार करण्याची आवश्यकता आहे. 

नक्की वाचा - Love Story: 53 VS 23! ज्या काकांच्या मांडीवर खेळली... मोठी झाल्यावर त्याच अंकलसोबत तरुणीनं केले लग्न

कोणला घेतलं ताब्यात?

चोरीच्या आरोपाखाली चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ते स्थानिक आरोपी आहेत. त्यांचा संघटित गुन्ह्यांशी संबंध नाही. पॅरिसचे वकील लॉर बेको यांनी सांगितलं की, या टीममध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. ते सीन-सेंट-डेनिस भागात राहतात. त्यातील एकाविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १० गुन्हे दरोड्याचे आहेत. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड विविध गुन्ह्यांचा आहे. परंतु संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी असलेल्यांपेक्षा तो सामान्य आहे, असं बेको म्हणाले.

आणखी एका संशयितावर यापूर्वी १५ गुन्हे दाखल आहेत, ज्यात दरोड्याच्या दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. संघटित गुन्हेगारीशी संबंध नसलेले लोक गंभीर गुन्ह्यांकडे वळत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. चोरांनी Louvre च्या वरच्या मजल्यावरील अपोलो गॅलरीमधून दागिने चोरले. संग्रहालयाच्या एका टोकावरील खिडकीतून आत जाण्यासाठी त्यांनी ट्रकला जोडलेल्या शिडीचा वापर केला. त्यांनी दोन उच्च-सुरक्षा डिस्पेल बॉक्सच्या काचा फोडल्या आणि एकूण नऊ वस्तू घेऊन पळून गेले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com