
चुक एकाने केली पण शिक्षा मात्र अनेकांना मिळाली. असं जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे गावात घडलं आहे. या गावाने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणात भयंकर गोष्ट म्हणजे या कुटुंबाची त्यात काही ही चुक नाही. ज्याने चुक केली त्याला शिक्षा द्या आम्हाला शिका का देता? असा प्रश्नच या कुटुंबाने उपस्थित केला आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत झालेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकला आहे. त्यामुळे लवकरच न्याय मिळावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जालना जिल्ह्यात जवखेडा ठोंबरे हे गाव आहे. या गावातील एका कुटुंबावर गावातीलच मुलीची छेड काढण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाय याची शिक्षा म्हणून कुटुंबाला वाळीत टाकण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. शिवाय वाळीत टाकल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचं शेतातील उभं पीक उध्वस्त केलं. गायरान जमिनीवर असणारी विहीर देखील बुजवल्याचा आरोप ही या पीडित कुटुंबाने केला आहे.
गावकरी ऐवढ्यावरच थांबले नाहीत. तर संबंधीत कुटुंबा बरोबर बोलण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जर या कुटुंबाबरोबर कुणी बोलला, गावाचा नियम मोडला तर त्याला 1 लाखाचा दंड ही ठोठावण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. शिवाय त्यांना गावात वस्तू खरेदी करण्यावरही बंधनं घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या गुन्ह्यासाठी संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे त्यात या कुटुंबाचा दोष नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?
हा गुन्हा कुटुंबातील काकाने केला आहे. त्यामुळे त्याला शिक्षा द्यावी अशी मागणी या पीडित कुटुंबाने केली आहे. त्याची शिक्षा आम्हाला कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणात आम्हाला न्याय द्या अशी मागणी पीडित कुटुंबानं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आमच्या काकाने मुलीची छेड काढली त्यांची शिक्षा त्यांना द्यावी आम्हाला का? असा प्रश्न देखील पीडित कुटुंबातील मुलीने उपस्थित केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world