जाहिरात

SIT Report : Sting ऑपरेशन आणि गायब लॉगबुक! फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा 'गेम प्लॅन' काय होता? वाचा सविस्तर

SIT Report : एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ, गायब झालेली लॉग बुकची पाने आणि साक्षीदारांना दिलेल्या धमक्या यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.

SIT Report : Sting ऑपरेशन आणि गायब लॉगबुक!  फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा 'गेम प्लॅन' काय होता? वाचा सविस्तर
SIT Report : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना अडकवण्याचा कट झाला होता.
मुंबई:

SIT Report :  राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण आता समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सध्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांना थेट तुरुंगात धाडण्याचा एक मोठा कट रचला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आपला अहवाल सादर केला असून, यामध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत.

एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ, गायब झालेली लॉग बुकची पाने आणि साक्षीदारांना दिलेल्या धमक्या यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणाचा उगम 2024 मध्ये झाला. त्यावेळी विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी सभागृहात गंभीर आरोप केले होते. राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर उद्योगपती संजय पुनमिया यांनी एक खळबळजनक स्टिंग व्हिडिओ समोर आणला.

या व्हिडिओमध्ये मुंबईचे निवृत्त एसीपी सरदार पाटील हे तत्कालीन उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या दबावाखाली कशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले, याची माहिती देताना दिसत आहेत. या कटाचा मुख्य उद्देश या दोन्ही बड्या नेत्यांना कायदेशीर कचाट्यात पकडून त्यांना अटक करणे हाच होता, असे यातून स्पष्ट होत आहे.

( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )

एसआयटीच्या तपासात समोर आलेले पुरावे

या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे गृह विभागाने मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 4 सदस्यीय एसआयटी नेमली होती. या पथकाने केलेल्या तपासात असे आढळून आले की, ठाणे नगर पोलीस ठाण्यात 2016 मध्ये नोंदवलेल्या एका जुन्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याच्या नावाखाली हा कट रचण्यात आला होता. 

या प्रकरणात आधीच दोषारोपपत्र दाखल झाले असतानाही केवळ राजकीय दबावापोटी पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली. तपास पथकाने कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये स्टिंग व्हिडिओची तपासणी केली, ज्यात त्यातील संभाषणाची सत्यता सिद्ध झाली आहे. तसेच सरकारी गाडीच्या लॉगबुकची पाने गायब असल्याचे समोर आले असून, हे पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रकार असल्याचे मानले जात आहे.


( नक्की वाचा : Mira Bhayandar मीरा-भाईंदरमध्ये भूकंप! प्रताप सरनाईकांचा मास्टरस्ट्रोक,निवडणुकीपूर्वी भाजपा नेते शिवसेनेत दाखल )
 

बड्या पोलीस अधिकारी रडारवर

एसआयटीने सादर केलेल्या अहवालात तत्कालीन पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली आहे. 

तपासादरम्यान काही साक्षीदारांवर त्यांचे जबाब बदलण्यासाठी आणि शिंदे-फडणवीस यांची नावे गुन्ह्यात जोडण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या अहवालामुळे पोलीस दलातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

पुढे काय होणार?

हे प्रकरण केवळ चौकशीपुरते मर्यादित राहिले नसून ते मुंबई उच्च न्यायालयातही पोहोचले आहे. सरकारी वकील शेखर जगताप यांनी दाखल केलेल्या एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेला संजय पुनमिया यांनी आव्हान दिले आहे. आता एसआयटीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून, लवकरच या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com