Puja Khedkar Mothers Gun License : अहमदनगर जिल्ह्यातील सहा महिन्यांपूर्वी सनदी सेवेतून बरखास्त करण्यात आलेल्या 32 वर्षीय पुजा खेडकर प्रकरण खूप गाजले होते. खाडाखोड केलेली कागदपत्रे देणे, प्रशिक्षण कालावधीत चारचाकीवर अंबर दिवा लावणे आदींमुळे सहा महिन्यांपूर्वी पुजा खेडकर यांना सनदी सेवेतून बरखास्त करण्यात आले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुजा खेडरची आई मनोरमा खेडकर जमिनीचा वाद सुरू असताना समोरच्या व्यत्तीला पिस्तुल दाखवत, धमकावत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी मनोरमा यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय रद्द केला आहे.
(नक्की वाचा: रामायणादरम्यान डुकराचे पोट फाडून मांस खाल्ले, राक्षसाची भूमिका करणारा अभिनेता अटकेत)
या प्रकरणाची न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये मनोरमा यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी सांगितले की, परवाना रद्द करताना पुणे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. हा मुद्दा ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिसांचा निर्णय रद्दबातल केला.
पिस्तुलाने धमकावल्याप्रकरणी 18 जुलै 2024 रोजी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासोबत त्यांचे पती आणि अन्य पाच जणांवर गुन्हे दाखल केले.
(नक्की वाचा: पोलिस असल्याची बायकोला मारली थाप, एक वर्षानंतर जे झालं ते...)
नेमके काय आहे पूजा खेडकर यांचे प्रकरण?
पुजा खेडकरांनी प्रशिक्षणाच्या कालावधीत सरकारी निवास, कर्मचारी, गाडी आणि कार्यालयात वेगळ्या केबिनची मागणी केली होती. खासगी ऑडी मोटारीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र सरकारचा लोगो लावला. चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला सोडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला. युपीएससी परीक्षा देण्यासाठी खोटे आणि छेडछाड केलेली कागदपत्रे वापरली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world