रामायण सादर करत असताना भर मंचावर जिवंत डुक्कर मारून त्याचे मांस खाणाऱ्या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेबद्दलची माहिती मंगळवारी म्हणजेच 2 डिसेंबरला मिळाल्याचे कळते आहे. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यामध्ये रामायणाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटक सुरू असताना 45 वर्षांच्या या अभिनेत्याने जिवंत अभिनय करण्याच्या नादात डुकराला ठार मारले आणि त्याचे मांस खाल्ले. या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामुळे संपूर्ण ओडिशा राज्यात संतापाची लाट उसळळी आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला अभिनेता रामायणातील राक्षसाछी भूमिका साकारत होता. बिंबाधर गौडा असं या अभिनेत्याचे नाव आहे. 24 नोव्हेंबर रोडी हिंजिली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रालाब गावात हे नाटक आयोजित करण्यात आले होते. या नाटकाच्या आयोजकांनाही अटक करण्यात आली आहे.
नक्की वाचा : एक्स-बॉयफ्रेंडला नव्या मैत्रिणीसह जाळून मारले, अभिनेत्री नर्गिस फाकरीच्या बहिणीला अटक
ओडिशात भाजपची सत्ता असून सत्ताधारी पक्षाचे बाबू सिंह आणि सनातन बिजुली यांनी विधानसभेत सदर घटनेची निंदा केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक पशू अधिकार कार्यकर्त्यांनी अभिनेत्याला आणि नाटकाच्या आयोजकांना अटक करण्याची मागणी केली होती. बेरहामपुर विभागीय वन अधिकारी सनी खोखर यांनी म्हटले की, सदर नाटकामध्ये सापही आणण्यात आले होते. हे साप आणणाऱ्यांचाही आम्ही शोध घेत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल.