Kalyan News : कल्याणच्या 'या' चौकात तुफान हाणामारी, आजीबाई मध्यस्थी करायला गेल्या अन् भलतच घडलं, CCTV Video

कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक परिसरातील एका कार्यालयात काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर संतप्त झालेला एक तरुण कार्यालयाबाहेर आला. त्यानंतर भर चौकात मोठा राडा झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan CCTV Video Viral

Kalyan CCTV Video Viral : कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक परिसरातील एका कार्यालयात काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर संतप्त झालेला एक तरुण कार्यालयाबाहेर आला. या तरुणाने लाल रंगाची टोपी घालून कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीजवळ जाऊन तिची तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.हा व्हिडीओ व्हायरल होताच कार्यालयातील काही कर्मचारी आणि संबंधित व्यक्ती बाहेर धावत आले.त्यांनी सुरुवातीला तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने कोणाचं ऐकलं नाही. त्यानंतर संतप्त झालेल्या काही लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली.

संतापलेल्या व्यक्तीने दुचाकीला जोरदार लाथ मारली आणि..

व्हिडीओत पाहू शकता की,  हा तरुण लाल रंगाची टोपी घालून कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीजवळ जाताना दिसत आहे.संतापाच्या भरात त्याने दुचाकीला जोरदार लाथ मारली आणि ती दुचाकी खाली पाडली. दुचाकीची तोडफोड केल्यानंतर काही जणांनी त्याला पकडलं आणि चांगलाच चोप दिला. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये संबंधित तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Trending News : ओमान किनारपट्टीजवळ जहाजावर हल्ला,24 भारतीय खलाशी अडकले, समुद्रातील Video आला समोर

आजीने मध्यस्थी करत मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला

या गोंधळादरम्यान एका आजीने मध्यस्थी करत मारहाण थांबवण्याचा प्रयत्न करतानाही दिसून येत आहे.त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान,हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या घटनेची कोणत्याही पोलीस ठाण्यात अद्यापही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.