Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या सफाई कामगाराची ऑन ड्युटी हत्या, बायकोनंही जीवन संपवलं, कारण काय? 

धक्कादायक बाब म्हणजे पती महादू जगताप यांची हत्या झाल्याचं कळताच पत्नीनेही राहत्या घरी आत्महत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ulhasnagar Crime News
मुंबई:

Ulhasnagar Crime News Today : उल्हासनगर महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याची ऑन ड्युटी असताना हत्या करण्यात आलीय.महादू जगताप असं हत्या झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचं नाव आहे. दिवसा ढवळ्या सफाई कर्मचाऱ्याची हत्या करणारा आरोपी दुर्गेश गुप्ताला सेंट्रल पोलिसांनी अटक केली आहे.'नेहमी रागाने का बघतोय'असं विचारत दुर्गेश गुप्ता यांनी महादू जगतापची हत्या केली. 

याप्रकरणी उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी हत्या करणाऱ्या दुर्गेश गुप्ताला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पती महादू जगताप यांची हत्या झाल्याचं कळताच पत्नीनेही राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महादू आज उल्हासनगर कॅम्प 3 च्या सेक्शन 20 भागातील आनंद आईस्क्रीमच्या परिसरात साफ सफाईचे काम करत होता. 

घरातील कचरा आरोपी दुर्गेश गुप्ता इकडे तिकडे पसरवायचा. सफाई कर्मचारी महादू जगतापने त्याला कचरा व्यवस्थित ठेवण्याची वारंवार विनंती केली होती. दररोज सफाई कर्मचारी महादू जगताप आणि दुर्गेश गुप्ता यांचा वाद व्हायचा. आज कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या जगतापलासोबत गुप्ताने वाद घातला. तू माझ्याकडे रागाने का बघतोस असं दुर्गेश गुप्ताने महादूला विचारलं आणि रागाच्या भरात त्याची हत्या केली, अशी माहिती उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या 'या' भागात बिल्डरांचं अतिक्रमण, संतापलेले नागरिक KDMC मध्ये म्हैस घेऊन धडकले, Video

सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

त्यावेळी दुर्गेश गुप्ता नावाच्या व्यक्तीने त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दुर्गेशचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. उल्हासनगर पोलिसांनी आरोपी दुर्गेशच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान, आरोपी दुर्गेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येमुळे सफाई कामगार वर्गांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.तसच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील 'या' भागात 2 बिबट्यांचा वावर, एक जेरबंद, दुसरा कुठे फिरतोय? थरकाप उडवणारा व्हिडीओ