जाहिरात
This Article is From Jan 15, 2025

Mumbai News: 13 व्या मजल्यावरून उडी मारली तरी तो वाचला, त्याच्या बरोबर काय घडलं?

तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी त्याची चौकशी केली.

Mumbai News: 13 व्या मजल्यावरून उडी मारली तरी तो वाचला, त्याच्या बरोबर काय घडलं?
मुंबई:

भाग्यश्री प्रधान आचार्य 

देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. त्याचा प्रत्यय मुंबईत आला. मुंबईतल्या विक्रोळीत एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीच्या 13 व्या माळ्यावरून एक कामगाराने आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. पण आश्चर्य या कामगाराला काहीच झालं नाही. त्याचा जीव वाचवा.बिरजूप्रसाद रमेश बनरवा असं या मजूराचं नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरचा असल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी इमारती खाली मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. ज्या वेळी त्याने 13 व्या मजल्यावरून उडी मारली त्यावेळी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता.

विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागात एका इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू आहे. त्यापैकी 57 क्रमांकाच्या इमारतीवरून एक कामगार चढला होता. त्याला आत्महत्या करायची होती. त्यासाठी तो 13 व्या मजल्यावर गेला. तिथून त्याने कसला ही विचार न करता उडी मारली. पण त्याचे नशिब चांगले. त्यांनी उडी मारल्यानंतर तो थेट आठव्या मजव्यावर लावलेल्या सुरक्षा जाळीत अडकला. त्याला काय झालं हे समजलं नाही. पण त्याला काही करुन आपलं जीवन संपवायचं होतं. त्याला आत्महत्या करायचीच होती. 

नक्की वाचा :Honor killing: 'मी दुसऱ्या मुलावर प्रेम करते' गावासमोरच बाप अन् भावाने लेकीला धाडधाड गोळ्या घातल्या

त्यामुळे आठव्या मजल्यावरील सुरक्षा जाळीवर पडल्यानंतर तो परत उभा राहीला. त्याने तिथून उडी मारण्याचं ठरवलं. कसाबसा उभा रहात त्याने पुन्हा आठव्या माळ्यावरून खाली उडी मारली. यावेळी ही त्याला त्याच्या नशिबाने साथ दिली. आठवल्या माळ्यावरून तो थेट तिसऱ्या माळ्यावर लावलेल्या सुरक्षा जाळीत अडकला. तो पर्यंत इमारती खाली मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. मोठा बवाल माजला होता. त्याला उडी मारू नको असं लोक खालून सांगत होते. पण दोन उड्या मारूनही त्याला जिवदान मिळाले होते. पण तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 

तिसऱ्या माळ्यावरील सुरक्षा जाळीत अडकल्यानंतर बिरजूप्रसाद परत उभा राहीला. तो पर्यंत खाली लोकांनी आणखी एक जाळी हातात धरून ठेवली होती. त्याला काही होवू नये असा प्रयत्न तिथल्या लोकांचा होता. पण बिरजूप्रसाद आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत होता. त्याने परत एकदा तिसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारली. यावेळी खाली लोक जाळी घेवून उभेच होते. त्या जाळीत तो परत अडकला. तीन उड्या मारल्यानंतर ही तो खाली सुरक्षित होता. तो खाली पडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला ताब्यात घेतले. 

तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यात तो उत्तरप्रदेश मधील गोरखपूरचा रहीवाशी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याची समजूत काढून मुळ गावी पाठवले आहे. मात्र 13 व्या मजल्यावरून उडी मारून ही तो सुरक्षित राहीला हे केवळ त्याचे नशिब असल्यानेच घडले. त्यामुळेच देव तारी त्याला कोण मारी याचा अनुभवच विक्रोळीतल्या लोकांनी घेतला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com