जाहिरात

Pimpri Chinchwad Crime: महिलांचे कपडे, हातात शस्त्र.. मणिपुरी तरुण घरात शिरला अन्.. चिंचवडमध्ये भयंकर घडलं!

Manipuri Youth Robbery Pune News: महिलांचे वस्त्र परिधान करून तसेच चेहऱ्यावर स्कार्फ बांधून सांगबोई कोम सेरटो ह्या मणिपुरी तरुणाने अत्याधुनिक  शस्त्र साठ्यासह दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

Pimpri Chinchwad Crime: महिलांचे कपडे, हातात शस्त्र.. मणिपुरी तरुण घरात शिरला अन्.. चिंचवडमध्ये भयंकर घडलं!

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका उच्चशिक्षित मणिपुरी तरुणाने  हॅन्ड गन , 19 बुलेटस, दोन हँड ग्रॅन्ड सदृश्य वस्तू आणि कुकरी बाळगून शहरातील कल्पतरू ह्या उच्चभ्रू सोसायटीतील एका बँक मॅनेजरच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात.

समोर आलेल्या माहितीनुसार, 31 जुलै च्या संध्याकाळी सात वाजता दरम्यान सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्पतरू सोसायटी फेज थ्री मधील पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर सिताराम बडेजा यांच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न घडला आहे. महिलांचे वस्त्र परिधान करून तसेच चेहऱ्यावर स्कार्फ बांधून सांगबोई कोम सेरटो ह्या मणिपुरी तरुणाने अत्याधुनिक  शस्त्र साठ्यासह दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

Navi Mumbai: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांनी गमावली दृष्टी; बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल

तरुणाने कल्पतरू या सोसायटीत  महिलांचे वस्त्र परिधान करून प्रवेश प्रवेश केल्याने त्याने कोणी अडवले नाही,  स्वतःला कुरियर बॉय आहे असं सांगून, त्याने सिताराम बडेजा  यांच्या नावाने आलेला पार्सल द्यायचा आहे असं सांगून त्यांच्या घरात त्याने बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सिताराम बडेजा यांचा मुलगा गगन बडेजा आणि मधुर बडेजा यांच्याशी झालेल्या झटापटीत मणिपुरी तरुणाने आपल्याजवळ बाळगलेल्या हॅण्ड गनने मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र बडेजा बंधूंनी त्याला कसं बस आवरून त्याला आपल्या घरात असलेल्या दोरीने बांधून बंदिस्त केलं.

त्यानंतर  पोलिसांना कळवून मणिपुरी तरुणाला सांगवी पोलिसांच्या स्वाधीन केल आहे. सांगवी पोलिसांनी केलेल्या तपासात सांगबोई कोम सेरटो याच्याकडे असलेली हँड गन ही शस्त्र परवाना धारक असून त्याच्या ताब्यातून 19 बुलेट, दोन हँड ग्रॅनेड सदृश्य वस्तू आणि एक कुकरी मिळाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. दरोडा टाकताना जर आपण पकडलं गेलो तर आपल्याला निसटता यावं यासाठी त्याने हॅण्ड गन च्या बुलेटला प्लास्टिक पाईप आणि इलेक्ट्रिकचे वायर लावून हँड ग्रॅनेड सदृश्य वस्तू बनवल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Cloud burst video: संपूर्ण गावाला नदीनं गिळलं, ढगफुटीची दृश्य पाहून काळीज थरथरलं, पाहा Video

सांगबोई कोम सेरटो हा उच्चशिक्षित आयटी अभियंता असून, त्याने त्याची नोकरी गमावल्याने आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी त्याने हे जबरी चोरी करण्याचं कृत्य  केल्याच पोलीस तपासात आता उघडकिस आलं आहे. या  प्रकरणात सांगवी पोलिसांनी मणिपुरी तरुण सांगबोई कोम सेरटो विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 309 ( 6),  312, 333 आणि शस्त्र अधिनियम 1959 च्या 25 (3) 25 (4) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com