जाहिरात
This Article is From Sep 23, 2024

मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मराठा आरक्षणासाठी 48 तासात 2 जणांनी संपवलं आयुष्य

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे मला प्रचंड वेदना होत असल्याचं या मराठा तरुणाने आपल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मराठा आरक्षणासाठी 48 तासात 2 जणांनी संपवलं आयुष्य
हिंगोली:

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी गेल्या (Manoj Jarange Patil) सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येतही खालावली होती. यामुळे मराठा समाजाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील (Maratha Reservation) शिवाजी उर्फ अमोल विठ्ठल निलंगे यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी निलंगे यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

या घटनेला एक दिवस उलटतो तोच हिंगोलीतून एका मराठा बांधवाने आपला जीव संपवल्याचा प्रकार घडला आहे. हिंगोलीतील वसमत तालुक्यातील मुडी येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साईनाथ पडोळे असं मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान या तरुणाच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळली आहे.

Latest and Breaking News on NDTV

मनोज जरांगे पाटील यांचे सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे, त्यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत. सरकार मराठा आरक्षणाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातील हुजूरपागा मुलींच्या शाळेतील 'ईद-ए-मिलाद' च्या कार्यक्रमावरुन मोठा गदारोळ

नक्की वाचा - पुण्यातील हुजूरपागा मुलींच्या शाळेतील 'ईद-ए-मिलाद' च्या कार्यक्रमावरुन मोठा गदारोळ

आत्महत्या करण्यापूर्वी धाराशिवचे निलंगे यांनी चिठ्ठीत लिहिले की, माझ्यावर ट्रॅक्टर व शेतीचे कर्ज जास्त झाले आहे. त्यात यावर्षी नापिकी आहे. तसेच माझ्या मुलाचा नंबर सैनिकी स्कूल यादीत सर्वात शेवटी लागला. जास्त गुण असून देखील हा अन्याय मराठा समाजावर का? असा सवाल अमोल निलंगे यांनी विचारला आहे. पहिल्या यादीत इतर मागासवर्गीय यांचा नंबर लागला. आमच्या समाजाला मराठा आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मी आत्महत्या करत आहे, असं अमोल निलंगे यांनी म्हटलं. 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)