पती पत्नी और वो या ट्रँगलमध्ये आतापर्यंत ज्या घटना समोर आल्या आहेत त्यात पतीला आपला जीव गमवावा लागला आहे. मेरठ शहरात 'सौरभ हत्याकांड' अजून ताजे असतानाच, पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. यापूर्वी 'मुस्कान'ने प्रियकरासोबत मिळून पतीला तुकड्यांमध्ये कापून सिमेंटच्या ड्रममध्ये टाकले होते. हे अजूनही देश विसरलेला नाही. या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरून गेला होता. हे कमी की काय आता तीन मुलांची आई असलेल्या 'अंजली'ने प्रियकराच्या मदतीने पती राहुल सोबत भयंकर कांड केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मेरठ हादरून गेले आहे.
हत्येची क्रूर पद्धत आणि ठिकाण
ही धक्कादायक घटना मेरठमधील परीक्षितगढ पोलीस स्टेशन हद्दीतील अगवानपूर गावात घडली आहे. 1 नोव्हेंबर रोजी गावाबाहेरील एका शेतात राहुलचा मृतदेह आढळला. मृतदेहावर तीन गोळ्यांचे निशाण होते. थेट त्याच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या होत्या. त्यामुळे खुनी किती निर्दयी होता हे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला पोलिसांनी लुटमारीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. पण तपासाची दिशा बदलल्यावर वेगळेच रहस्य उलगडले. त्याने पोलीसही हादरून गेले.
पत्नीची चौकशी सुरू होताच ती झाली फरार
पोलीस अधीक्षक विपिन ताडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाला राहुलच्या हत्येमागे अवैध संबंधांचा संशय आला. या संशयावरून पोलिसांनी राहुलची पत्नी अंजली हिची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याच वेळी अंजली घरातून अचानक फरार झाली. तिचा प्रियकर अजय जो त्याच गावातील होता. तो देखील गायब झाल्याचे पोलिसांना कळाले. या घटनेने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांनी या दोघांनाही शोधण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा - Two wheeler Toll: दुचाकीला टोल का द्यावा लागत नाही? 99 टक्के लोकांना कारणच माहित नाही
प्रियकराने उघड केले हत्येचे कारण
पोलिसांनी काही काळानंतर अंजली आणि अजय या दोघांनाही अटक केली. कसून चौकशी केल्यावर अजयने संपूर्ण कट उघड केला. अंजली आणि त्याचे असलेले अनैतिक संबंध राहुलला कळाले होते. याच कारणामुळे संतप्त झालेल्या अंजलीने पतीला कायमचे रस्त्यातून हटवण्याचा कट रचला. त्यानुसार, अजयने राहुलला घरी बोलवून त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याचा मृतदेह झुडपात फेकून दिला. पतीच्या मृत्यूनंतर अंजलीने केलेले रडणे-ओरडणे केवळ एक ढोंग होते. हे सत्य समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world