जाहिरात

Thane News: मेरठ हत्याकांडाची मुंब्रा येथे पुनरावृत्ती! प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला

पोलीसांना काही तासात की केस सोडवण्यात यश आले. मात्र या केसच्या निमित्ताने मेरठ प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Thane News: मेरठ हत्याकांडाची मुंब्रा येथे पुनरावृत्ती! प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला
  • मुंब्रा ठाण्यात महजबीन, तिचा पती आणि भाव यांनी अरबाज मकसूद अली खान याची निर्घृण हत्या केली आहे
  • मृतदेह ड्रममध्ये भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यामुळे प्रकरण अधिक थरारक ठरले आहे
  • अरबाजचा मृत्यू खंडणीच्या वादातून पाईपने मारहाण करून झाला असून, महजबीनने गुन्हा कबूल केला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
ठाणे:

उत्तर प्रदेशातील गाजलेल्या मेरठ ड्रम हत्याकांडाची आठवण करून देणारी एक थरारक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ड्रममध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. अरबाज मकसूद अली खान असे मृत तरुणाचे नाव आहे. ज्यावेळी अरबाजच्या कुटुंबीयांनी तो घरी आला नाही म्हणून शोध घेतला. पण तो भेटला नाही. शेवटी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. आपण दादरला जात असल्याचं सागून तो घरातून निघाला होता. मात्र तो परत आलाच नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज खान 3 एप्रिल 2026 रोजी घरातून 'पैसे आणण्यासाठी दादरला जातो' असे सांगून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली होता. त्यावेळी अरबाजच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे दिसून आले. याच लोकेशनवर त्याची प्रेयसी महजबीन हिचेही वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीसांनी सापळा रचला. माहिती मिळवली. त्यानंतर प्रेयसी महजबीन हीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 

नक्की वाचा - Work From Home: आठवड्यातून दोन दिवस 'वर्क फ्रॉम होम', मंत्री- अधिकाऱ्यांना 'मंडे मेट्रो', नवी नियमावली जाहीर

संशयावरून पोलिसांनी महजबीनला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या महजबीनने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. खंडणीच्या पैशांवरून झालेल्या वादातून तिने पती आणि भावाच्या मदतीने अरबाजचा काटा काढल्याचे तपासात समोर आले आहे. आधी त्याला बोईसर येथे बोलावण्यात आले. त्यानंतर त्याचा पाईपने मारहाण करण्यात आली. तो इतके मारले की त्याचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर तो लपवण्यासाठी त्यांनी ड्रमचा वापर केला. हत्या केल्यानंतर मृतदेह एका ड्रममध्ये भरून तो लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असं तिने आपल्या चौकशीत सांगितले. 

नक्की वाचा - Sharad Pawar: 'मोदींच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा पण...' शरद पवारांनी टाकली गुगली, केली मोठी मागणी

या प्रकरणातील मुख्य आरोपी महजबीनसह तिच्या पतीला आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. "तांत्रिक तपास आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे आम्ही आरोपींपर्यंत पोहोचलो आहोत. पैशांचा वाद हे या हत्येमागील प्राथमिक कारण असल्याचे दिसत आहे," अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाले यांनी दिली आहे. पोलीसांना काही तासात की केस सोडवण्यात यश आले. मात्र या केसच्या निमित्ताने मेरठ प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com