जाहिरात

Meerut Murder Case : 'आई-वडील नाराज, कोणीतरी वकील द्या...'; तुरुंगात मुस्कानची भीषण अवस्था

नशा मिळत नसल्यामुळे मुस्कान आणि साहिल दोघेही अस्वस्थ असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितलं जात आहे.

Meerut Murder Case : 'आई-वडील नाराज, कोणीतरी वकील द्या...'; तुरुंगात मुस्कानची भीषण अवस्था

Meerut Murder Case : 'माझे आई-वडील माझ्याशी बोलत नाहीत..कोणीच माझी केस लढण्यास तयार नाही. माझी केस लढण्यासाठी सरकारी वकील हवा आहे...' आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करणारी मुस्कान आता एका सरकारी वकिलाची मागणी करीत आहे. आपल्या कुटुंबाची साथ न मिळाल्याने आता ती तुरुंग अधिक्षकांसमोर हात जोडून विनंती करीत आहे. दुसरीकडे मुस्कानचा प्रियकर साहिलच्या कुटुंबातून कोणीतरी मदतीसाठी येईल अशी त्याला अपेक्षा आहे. मात्र अद्याप साहिलने सरकारी वकिलाची मागणी केलेली नाही. सध्या हे दोन्ही आरोपी मेरठमधील चौधरी चरण सिंह जिल्हा तुरुंगात आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सौरभ हत्याकांडाचा आरोपी मुस्कानने तुरुंग अधिक्षकांकडे विनंती केली आहे. तिने आपली केस लढण्यासाठी सरकारी वकिलाची मागणी केली आहे. मुस्कानने तुरुंग अधीक्षक वीरेश राज शर्मा यांना लिखित पत्रात ही मागणी केली आहे. तुरुंग अधिक्षकांनी सांगितलं की, मुस्कानने शनिवारी त्यांना भेटीची इच्छा व्यक्त केली होती. भेटीदरम्यान तिने सरकारी वकील मिळण्याबाबत विचारणा केली. यावर वीरेश राज शर्मा म्हणाले की, कैद्याजवळ त्याचा वकील नसेल तर त्याला सरकारी वकील दिला जावा हा कैद्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुस्कानचं प्रार्थना पत्र कोर्टात पाठविण्यात येणार आहे. तुरुंग अधिक्षकांनी सांगितलं की, सोमवारी हा अर्ज तुरुंगात पाठविण्यात येणार आहे. 

Meerut Murder : आरोपी साहिलच्या घरातील पेंटिंगवरुन अनेक सवाल, एकीकडे महादेव तर दुसरीकडे सैतानाचं चित्र; याचा अर्थ काय?

नक्की वाचा - Meerut Murder : आरोपी साहिलच्या घरातील पेंटिंगवरुन अनेक सवाल, एकीकडे महादेव तर दुसरीकडे सैतानाचं चित्र; याचा अर्थ काय?

तर या प्रकरणातील सह-आरोपी साहिलने सरकारी वकील घेण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तो आधी आपल्या कुटुंबीयांशी बातचीत करेल. त्यानंतर ठरविण्यात येईल. 

दोन्ही आरोपी व्यसनी...
मुस्कान आणि साहिल दोघांनाही अनेक व्यसनं आहेत. तुरुंग प्रशासनाने त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर उपचार सुरू केले आहेत. कोर्टाकडून मुस्कान आणि साहिलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. नशा मिळत नसल्याने दोघेही बैचेन आहेत. त्यांना रात्रभर झोपही येत नाही. 
व्यसनातून मुक्तता होण्यासाठी दोघांची औषधं सुरू असून समुपदेशनही केले जात आहे. वीरेश शर्मा यांनी सांगितलं की, नशेमुळे होणारे विड्रॉल सिम्टम्स (नशा सोडताना होणारे शारिरीक आणि मानसिक बदल) रोखण्यासाठी औषधं दिली जात आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: