जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar : 'महानगरपालिका तुमच्या बापाची जहागीर नाही', 14 नगरसेवकांनी पसरवली परिसरात दहशत

संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमच्या 14 नगरसेविका आणि त्यांच्या पतींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : 'महानगरपालिका तुमच्या बापाची जहागीर नाही', 14 नगरसेवकांनी पसरवली परिसरात दहशत

मोसीन शेख, प्रतिनिधी


Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या विरोधीपक्ष नेत्यासह एमआयएमच्या 14 नगरसेविका आणि त्यांच्या पतींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान विरोधीपक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी या कारवाईला विरोध केला होता.

तसेच कारवाई करण्याऱ्या पथकाला पिटाळून लावले होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या महिला उप-आयुक्त सविता सोनवणे यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवकांच्या 14 नगरसेवकांसह ४० ते ५० जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Sambhajinagar : अमली पदार्थ तस्करांना दणका, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मोठ्या कारवाईच्या तयारीत

एमआयएम नगरसेवकांवर आरोप 

एमआयएमच्या नगरसेवकांनी अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, धमकी देत धक्काबुक्की केल्याचं सांगितलं जात आहे. ​"महानगरपालिका तुमच्या बापाची जहागीर नाही" अशा शब्दांत दमदाटी करून हातगाडी चालकांना पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी भडकवण्यात आले होते. ​कारवाईसाठी आलेले जेसीबी आणि ट्रक बळजबरीने तिथून हटवण्यास भाग पाडले आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. ​या सर्व कृत्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले. प्रशासकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. विकास कामात अडथळा केल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकतं अशी पुरेपुर माहिती असतानाही सर्व नगरसेवकांनी जाणीवपूर्वक बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com